मराठा आरक्षणावर भाजप राजकारण करतयं, केंद्रात कायदा केल्याशिवाय आरक्षण अशक्य

केंद्रात त्यांचे तीनशे खासदार निवडून आलेले आहेत, बहुमत आहे, तिथे कायदा पास करून त्याचा अद्यादेश काढावा.
ex mla harashvardhan jadhav news Auragabad
ex mla harashvardhan jadhav news Auragabad

औरंगाबाद ः मराठा आरक्षणावरून प्रत्येक राजकीय पक्ष हा राजकारण करतोय. शिवसेना-भाजप युतीचे राज्यात सरकार होते तेव्हा विधीमंडळात ठराव पास करून मराठा आरक्षण कायदा करण्यात आला. मंत्री, आमदारांनी भगवे फेटे बांधून पेढे वाटले, फटाके फोडले. तेव्हाच मी हे आरक्षण कोर्टात टिकणार नाही, याला आव्हान दिले जाईल असे म्हटलो होतो. (political Party Durty Politics On Maratha Reservation Issue)  पण मला ट्रोल केले गेले, माझ्यावर टीकेची झोड उठवली. आज जी भिती मी व्यक्त केली होती तेच घडले. (Ex. Mla Harshvardhan Jadhav Critisise Bjp and Others) केंद्राने कायदा केल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, तेव्हा राजकारण बंद करा, असा टोला माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी आंदोलन पेटले असतांना तत्कालीन शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमदारकीचा राजीनामा दिला होता.  (Maratha Reservation Supreem Court Jdgement) त्यावेळी त्यांच्या या धाडसाचे राज्यभरातून कौतुकही झाले. तत्कालीन फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाचा कायदा विधानसभेत पास करून घेतला. त्याला हायकोर्टात आव्हान देण्यात आले, तिथे तो टिकला मात्र सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल होताच त्याला स्थगिती मिळाली, आणि आता तर तो रद्दच झाला.

या संपुर्ण घटनाक्रमावर हर्षवर्धन जाधव यांनी आज सोशल मिडियाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण टिकणार नाही हे जेव्हा मी बोललो होतो, तेव्हा मला सर्वच पक्षांनी विशेषतः भाजपने खूप ट्रोल केले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळाले तर याच्या पोटात दुखते अशी टीकेची झोड माझ्यावर उठवली गेली. पण आज मी जे बोललो ते खरे ठरले.\

( Central Governmetn Key Roll For Maratha Reservation) भाजपने मराठा आरक्षणावर फक्त राजकारण केले. केंद्रात कायदा केल्याशिवाय मराठा आरक्षण टिकणार नाही ही मी मांडलेली भूमिका योग्यच होती. आजही मी त्या भूमिकेवर ठाम आहे.

भाजपला मराठा समाजाचा पुळका आल्याचे त्यांचे नेते दाखवतात, पण त्यांना या समाजाला आरक्षण द्यायचे नाही, तर त्यावर केवळ आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे. जर त्यांना खरंच असं वाटतंय की मराठा समाजाला आरक्षण मिळावे तर केंद्रात त्यांचे तीनशे खासदार निवडून आलेले आहेत, बहुमत आहे, तिथे कायदा पास करून त्याचा अद्यादेश काढावा. आपल्या देशात लोकशाही आहे. संसंद सर्वोच्च असून त्यांनी केलेले कायदे हे सर्वोच्च न्यायालयाला मान्य करावेच लागतात. या आधी हे दिसून आले आहे.

तेव्हा केवळ राजकारण न करता भाजपने संसंदेत ठराव घेऊन मराठा आरक्षणाचा कायदा करावा, आणि आम्ही खरंच मराठा समाजाच्या बाजूने आहोत हे कृतीतून दाखवून द्यावे, असे आवाहन देखील हर्षवर्धन जाधव यांनी केले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com