अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, एमपीएससीची परिक्षा पुढे ढकला.. - Many students were infected with corona and postponed their MPSC exams. | Politics Marathi News - Sarkarnama

अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, एमपीएससीची परिक्षा पुढे ढकला..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 एप्रिल 2021

येत्या ११ एप्रिल रोजी घेण्यात येणारी परिक्षा शक्य नाही. कोरोना झाल्यामुळे तसेच लाॅकडाऊन सदृ्श्य परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना या परिक्षेला मुकावे लागेल.

औरंगाबाद ः राज्यात कोरोनाचा कहर सुरू आहे, सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत नवी कडक नियमावली लागू करण्यात आली आहे. शालेय परिक्षा रद्द करून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर येत्या ११ एप्रिल रोजी होणारी एमपीएससीची परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.

इम्तियाज जलील यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे. लाॅकडाऊनमुळे एमपीएससीचे राज्यभरातील सर्व क्लासेस, अभ्यासिका बंद आहेत. बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांना मेस बंद असल्याने गैरसोय झाली आहे. या शिवाय अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे देखील समोर आले आहे.

अशा परिस्थितीत येत्या ११ एप्रिल रोजी घेण्यात येणारी परिक्षा शक्य नाही. कोरोना झाल्यामुळे तसेच लाॅकडाऊन सदृ्श्य परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना या परिक्षेला मुकावे लागेल. त्यामुळे त्यांचे शैक्षिणक व आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे.

या सगळ्या गोष्टींचा विचार करून एमपीएससीची परिक्षा पुढे ढकलावी. तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी वयोमर्यादेत वाढ करावी, अशी मागणी देखील इम्तियाज जलील यांनी ट्विट्च्या माध्यमातून केली आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख