नांदेड जिल्हा बॅंकेत महाविकास आघाडीची सरशी

विजयी उमेदवारांमध्ये स्वतः खासदार प्रताप पाटील चिखलीकर, त्यांचे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांचा समावेश आहे.
Nanded District Bank- Pratap chikhlikar- Ashok Chavan news
Nanded District Bank- Pratap chikhlikar- Ashok Chavan news

नांदेड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलची सरशी होतांना दिसते आहे. २१ पैकी १८ जागांसाठी झालेल्या मतदानानंत आज मतमोजणीत आतापर्यंत हाती आलेल्या निकालांमध्ये काॅग्रेसने सर्वाधिक ८ जागा जिंकल्या आहेत. तर शिवसेना व राष्ट्रवादी या पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. तर विरोधी पॅनलच्या चार जागा आल्या आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण व भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर या दोन नेत्यांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली होती.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यातील राजकीय वातावतण चांगलेच तापले होते. २१ संचालकांपैकी तीन जागा आधीच बिनविरोध निवडूण आल्याने १८ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले होते. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा सुरूवातीपासूनच महाविकास आघाडीच्या पॅनलला यश मिळतांना दिसले. आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालानूसार काॅंग्रेस-, शिवसेना-, ऱाष्ट्रवादी-१ तर भाजपच्या पॅनलला -४ जागा मिळाल्या आहेत.

विजयी उमेदवारांमध्ये स्वतः खासदार प्रताप पाटील चिखलीकर, त्यांचे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांचा समावेश आहे. या शिवाय महाविकास आघाडीच्या पॅनलचे माजी वसंत पाटील चव्हाण, विजयसिंह देशमुख, हनमंत पाटील बेटमोगरेकर, जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष दिनकर दहिफळे हे विजयी झाले आहेत. देगलूर, धर्माबाद, नायगांव, मुदेखड मधून महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत.

एकंदरित जिल्हा बॅंकेवर पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणजेच काॅग्रेसचे वर्चस्व राहणार असे दिसते. गेल्यावेळी भाजपने काॅंग्रेसला एकाकी पाडत जिल्हा बॅंकेची सत्ता मिळवली होती. परंतु राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असतांना अशोक चव्हाण यांनी जिल्हा बॅंकेत परिवर्तन घडवल्याचे निकालांवरून स्पष्ट होत आहे. जिल्हा बॅकेत महाविकास आघाडीने आतापर्यंत सर्वाधिक जागा मिळवत भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना दणका दिल्याचे दिसून आले आहे.

माजी मंत्री पराभूत..

माजी मंत्री गंगाधर कुंटूरकर यांचा नायगांव सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून पराभव झाला आहे. कुटुंरकर यांंचेे कालच निधन झाले. आज मतमोजणीत त्यांचा माजी आमदार वसंत चव्हाण यांनी २८ विरुद्ध २२ मतांनी पराभव केल्याचे समोर आले .

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com