भाजप आमदार म्हणतात, महाविकास आघाडी सरकार केंद्राच्या जीवावर चाललंय..

जिवनावश्यक गोष्टींचा पुरवठा केंद्र सकारच्या माध्यमातून होत असतांना त्याचे फुकटचे श्रेय मात्र राज्य सरकार लाटत आहे.
Bjp Mla Abhimanyu Pawar news Aurangabad
Bjp Mla Abhimanyu Pawar news Aurangabad

औसा ः राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे केंद्राकडून प्रत्येक गोष्ट घेऊन चालत आहे. गोरगरिबांना गहू, तांदूळ, डाळ, खाद्यतेल आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केंद्र सरकारकडूनच सुरू आहे, श्रेय मात्र राज्य सरकार लाटत असल्याची खोचक टीका औशाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी केली आहे. (The Mahavikas Aghadi government in the state is running on the life of the Center, said Bjp Mla Abhimany pawar) मतदारसंघातील एका कार्यक्रमात बोलतांना पवार यांनी राज्य सरकारला टोला लगावला.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर तापलेल्या वातावरणात भाजपने मराठा समाजाला पाठिंबा दर्शवत या लढ्यात आपण समाजाच्या सोबत असल्याचे जाहीर केले आहे. अगदी रस्त्यावरील आंदोलनात उतरण्याची तयारी देखील भाजपने दाखवली आहे.

एकंदरित भाजपने महाविकास आघाडीच्या विरोधात आघाडी उघडल्याचे नेत्यांच्या विधानावरून स्पष्ट होते. भाजपचे उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारच्या कानाखाली आवाज काढण्याची भाषा केल्यानंतर आता औसा मतदारसंघाचे भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी देखील एक धाडसी विधान केले आहे. (BJP MLA Abhimanyu Pawar has also made a bold statement.) हे सरकारच केंद्रातील भाजप सरकारच्या जीवावर चालत असल्याची टीका पवार यांनी केली आहे.

मनरेगातून ग्रामविकास व यातील शेतकऱ्यांना फायदेशीर असणाऱ्या योजनांची माहीती देतांना दावतपूर येथे ते  बोलत होते.प्रत्येक गोष्ट केंद्राकडून घेऊन सध्याचे महाविकास अघाडी सरकार चालत आहे. गोर गरीबांना मिळणारे गहू, तांदूळ, डाळ, खाद्य तेल आदी जिवनावश्यक गोष्टींचा पुरवठा केंद्र सकारच्या माध्यमातून होत असतांना त्याचे फुकटचे श्रेय मात्र राज्य सरकार लाटत असल्याचा आरोप पवार यांनी केला.

नाकर्तेपणा झाकण्यातच रस..

हाताला काम देण्यासाठी केंद्र सराकर जॉबकार्ड धारकाला शंभर दिवसाचे काम देऊन त्याचा मोबदला देते. त्याच प्रमाणे जर शंभर दिवासांच्या वर काम गेले तर त्या वाढीव दिवसांच्या कामच्या मोबदल्याची जबाबदारी राज्य शासनाने घेतली पाहीजे. मात्र राज्य सरकारच्या वतीने फक्त शंभर दिवसाचाच मोबदला दिला जात आहे.

शंभऱ दिवसाच्या वर हजेरी भरली तर ती खोडून टाकायला सांगीतली जाते व हजारो लोक त्या पासुन वंचित राहत आहेत. नुसते केंद्राकडे बोट दाखवुन आपला नाकर्तेपणा झाकण्यातच या महाविकास आघाडीला रस असुन लोकांच्या हाताला काम दिले पाहीजे अन्यथा त्यांना घरी बसूुन रोजगार दिला पाहीजे. राज्य सरकार म्हणुन ती त्यांची जबाबदारी असतांना केवळ केंद्राकडून मिळणारा रोजगारच ते वाटप करीत असल्याचा आरोपही पवार यांनी यावेळी केला.

आगामी अधिवेशनात हा मुद्दा उचलुन लोकांची होणारी ही अडचण दुर करण्याचा निश्चितच प्रयत्न करणाल आहे. मनरेगातुन फळझाडांची लागवड, पशुधनाचे पालन पोषण करण्यासाठी गोठे या बाबत माहीती देण्यात आली. तर भविष्यात ज्या प्रमाणे औसा मतदारसंघ शेतरस्त्याच्या चळवळीसाठी राज्यातच नव्हे तर देशात चर्चीला जात आहे त्याच प्रमाणे अंबा उत्पादक म्हणुन ओळखला जाण्यासाठी शेतकऱ्यांनी अंबा लावगड करावी असे अवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com