राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिणीस पदी भरत घनदाट, जयंत पाटलांनी दिले नियुक्ती पत्र..

भोकर पंचायत समितीचे माजी सभापती भाऊसाहेब देशमुख-गोरटेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
Naded Political News
Naded Political News

मुंबई ः राष्ट्रवादी काॅंग्रेसचा २२ वा वर्धापनदिन नुकताच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत साजरा झाला. यावेळी मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील काॅंग्रेस आणि भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. (Letter of appointment given by Bharat Ghandat and Jayant Patil to the post of NCP State General Secretary) मुंबईत इतर पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे प्रवेश आणि नियुक्त्यांचे सत्र अजूनही सुरूच आहे. गंगाखेडचे माजी आमदार सिताराम घनदाट यांचे नातू  भरत घनदाट यांची राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते भरत घनदाट यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. पक्ष बळकटीसाठी व पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी भरत घनदाट यांचे सहकार्य राहील, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. (Ncp State President Jayant Patil) यावेळी माजी आमदार सीताराम घनदाट, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील उपस्थित होते

परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचे माजी आमदार व अभ्युदय बँकेचे संचालक सीताराम घनदाट यांनी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. (Ex. Mla Sitaram Ghndat) अजित पवार व जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईतच हा प्रवेश सोहळा पार पडला होता. घनदाट यांच्या प्रवेशाने गंगाखेडमध्ये राष्ट्रवादीला बळ मिळाले आहे. आता त्यांचे नातू भरत घनदाट यांच्यावर पक्षाने प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली आहे. 

 गोरटेकरांचा प्रवेश..

भोकर पंचायत समितीचे माजी सभापती भाजपचे भाऊसाहेब देशमुख-गोरटेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे हा प्रवेश झाला. यावेळी कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील, नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिहर भोसीकर उपस्थित होते.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com