मराठवाड्याचा पाणी प्रश्न मार्गी लावू ; राज्यमंत्री सत्तार यांची परिषदेत ग्वाही..

स्व. शंकरराव चव्हाण यांच्या नंतर मराठवाडा आता राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे मोठ्या आशेने पाहत असल्याचे रमेश गायकवाड म्हणाले.
Water Conference News-Ramesh Gaikwad-Abdul Sattar Aurangabad
Water Conference News-Ramesh Gaikwad-Abdul Sattar Aurangabad

औरंगाबाद : मराठवाड्यातील धरणाची क्षमता ११५ टीएमसी असून त्यातले ७३ टीएमचीच पाणी वापरायला मिळते. कै. शंकरराव चव्हाण पासून गोविंदभाई श्रॉफ यांच्यापर्यंत सर्वानी या संदर्भात चिंता व्यक्त केली होती. (Let's solve the water problem of Marathwada; Sattar testifies at water conference) रमेश गायकवाड यांनी या प्रश्नाला गांभीर्याने घेऊन मराठवाडा पाणी हक्क परिषदेचे आयोजन केले.

या निमित्ताने सर्वपक्षीय, जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन पाणी प्रश्न सोडवण्याची गरज आहे.( State Minister Abdul Sattar, Maharashtra) बैठकीत मांडलेल्या ठरावांशी मी सहमत असून याबाबत शासकीय स्तरावर पाठपुराव करून मराठवाड्याचा पाणी प्रश्न लवकरच मार्गी लावीन, अशी ग्वाही महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त मराठवाडा बहुजन विकास आघाडीतर्फे 'मराठवाडा पाणी हक्क परिषदेचे' आयोजन करण्यात आले होते. (Z.P. Member, Ramesh Gaikwad, Aurangabad) परिषदेचे उदघाटन महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

यावेळी सत्तार यांनी जिल्हा परिषद सदस्य, परिषदेचे स्वागताध्यक्ष तथा मराठवाडा बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी परिषदेसाठी पुढाकार घेऊन मराठवाड्याच्या हक्काच्या पाणी प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल त्यांचे कौतुकही केले.

सत्तार म्हणाले, मराठवाडा एक वर्ष उशिराने स्वतंत्र झाला. परंतु महाराष्ट्रात विलीन झाल्यानंतरही विविध कारणाने मराठवाडा मागासच राहिला आहे. त्यामुळे आपण पाणी हक्क परिषद आयोजित केली. मराठवाड्याला न्याय देणारे माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण, स्व. विलासराव देशमुख, स्व.गोपीनाथ मुंडे यांचे विकासासाठी मोठे योगदान आहे. आपण ७५ वर्षांपासून विकासाचा शोध घेतो आहे, परंतु लोकसंख्येच्या दृष्टीने मराठवाड्याचा विकास झाला नाही.

स्वतंत्र भारताची आखणी होत असताना मराठवाड्याला जायकवाडीच धरण बांधण्यात आलं. मराठवाड्याला १५७ टीएमसी पाणी येत होत. त्यापैकी १४३ टीएमसी पाणी नगर नाशिकनने पळवल्याने मराठवाड्याच्या वाट्याला आता फक्त १३ टीएमसी पाणीच मिळते आहे. २००५ चा कायदयानुसार १३ टीएमसी पाणी शिल्लक राहिले. वरच्या बाजूला धरणे बांधल्याने खाली पाणी येत नाही. यामुळे मराठवाड्यात औद्योगिकरण, सिंचन आदी होऊ शकले नाही.

या कारणास्तव मराठवाड्यात बेरोजगारीचे प्रमाण वाढले असून मोठ्या प्रमाणात आत्महत्या देखील होत आहेत. मराठवाड्याच्या हक्काचे २८.७५ टीएमसी पाणी आम्हाला मिळाले पाहीजे. यासाठी मंत्री म्हणून शासन स्तरावर संबंधित विभागाचे मंत्री, अधिकारी व मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू, असा विश्वास देखील सत्तार यांनी या निमित्ताने दिला.

गायकवाड यांनी पाणी प्रश्नावर सखोल अभ्यास करून मराठवाडा पाणी परिषद आयोजित केली आहे. त्यांनी मांडलेल्या ठरावाशी मी सहमत असून नाशिक- नगरने बळाचा वापर करून मराठवाड्याच्या हक्काचे पाणी अडवले आहे. पाणीप्रश्नमुळॆ मराठवाड्यात आत्महत्या होत असून बेरोजगारी देखील वाढली आहे. त्यामुळे आता सर्वानी एकत्र येऊन यासाठी लढण्याची गरज आहे.

मराठवाडा विलीन झाल्यानंतर स्व. शंकरराव चव्हाण यांनी नाथसागरा सारखे महाकाय धरण आपल्याला दिले.  परंतु आज घडीला त्यामध्ये ३२ ते ३३ टक्के एवढा गाळ साचलेला आहे. त्यासाठी शासनातर्फे लवकरच उपाययोजना करण्यात येईल. त्यासोबतच सिद्धेश्वर धरणाचे शिल्लक पाणी व गोदावरी खोऱ्यातील २८ टीएमसी पाणी मिळावे. अशी आमची सुद्धा मागणी असल्याचे  सत्तार म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचे मराठवाड्यावर विशेष प्रेम असून औरंगाबादला मंजूर केलेली १६८० कोटी रुपयांची योजना येत्या १८ महिन्यात पूर्णत्वास नेण्यात येणार आहे. सोबतच गायकवाड यांच्या मागण्यासाठी मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री आणि अन्य मंत्यासोबत चर्चा करून सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेल,असे आश्वासन देखील सत्तार यांनी परिषदेच्या निमित्ताने उपस्थितांना दिले. 

पश्चिम वाहिन्यांच्या पाण्याचे फक्त आश्वासन ः गायकवाड

मराठवाड्याला पश्चिम वाहिन्यांचे पाणी देण्याचे आम्हाला फक्त आश्वासनच देण्यात आले आहे. मराठवाड्याच्या ६४ लाख हेक्टर जमिनी पैकी १६ लाख हेक्टर वर सिंचन होऊ शकते. शासनाने नेहमी मराठवाड्याला अकार्यक्षम अधिकारी दिले आहेत, त्यामुळे मराठवाड्याचा विकास झाला नाही. २ लाख हेक्टर जमीन सुद्धा ओलिता खाली आली नाही. मराठवाड्यात पुन्हा सिंचन वाढला पाहिजे.

त्यामुळे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी हा विषय मुख्यमंत्र्यांकडे मांडावा. शासनाने औरंगाबाद शहरासाठी १६८० कोटींची योजना राबवली असून मागील अनेक वर्षांपासून ती विविध कारणाने रखडली आहे. आजही शहरातील सातारा, देवळाई, पडेगाव मिटमिट्याचे नागरिक थेंब थेंब पाण्यासाठी वणवण करत आहेत. स्व. शंकरराव चव्हाण यांच्या नंतर मराठवाडा आता राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे मोठ्या आशेने पाहत असल्याचे रमेश गायकवाड म्हणाले.

सत्तार यांनी मराठवाड्यातील पाण्या संदर्भातील सर्व मागण्या पूर्ण कराव्या अशी जनतेला अपेक्षा आहे.  यावेळी कार्यक्रम अध्यक्षा व  जिल्हा परिषद अध्यक्षा मीनाताई शेळके, प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. बांधकाम सभापती किशोर बलांडे, शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश गलांडे यांची प्रमुख पाहुणे उपस्थिती होती. परिषदेत कैलास गायकवाड यांनी पाणी परिषदेतील विविध सात ठराव मांडले. यावर सभागृहाने एकमताने मंजुरी दिली.

यावेळी रमेश जायभाये, शमीम बी.चौधरी, शेख अक्तर, संजय खरात, बी.टी. वाघमारे, के.व्ही.गायकवाड, संतोष राठोड, आप्पासाहेब घुगे, सचिन गंगावणे, प्रकाश निकम, रणजित पाटील, शिवा नरवडे, अशोक सुखधान, सूरज खाजेकर, विजय पट्टेकर, रावसाहेब खाडे, मनीष वीर आदींची उपस्थिती होती.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com