कुणी कुणालाही भेटू द्या, की हातमिळवणी करू द्या; शिवसेना सक्षमच.. - Let someone meet , let them shake hands; Shiv Sena is capable .. | Politics Marathi News - Sarkarnama

कुणी कुणालाही भेटू द्या, की हातमिळवणी करू द्या; शिवसेना सक्षमच..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 18 जुलै 2021

राज्यात पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारची कामगिरी अत्यंत चांगली सुरु आहे.

परभणी ः  राज्यात कोण कुणाशीही हात मिळवणी केली काय आणि नाही केली काय? त्याचा शिवसेनाला फारसा फरक पडत नाही.  कारण शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांवर चालणारी संघटना आहे. (Let someone meet , let them shake hands; Shiv Sena is capable, said State Home Minsiter Sambhuraj Desai)) राज्यात आज ही शिवसेना सक्षम असल्याचा विश्वास गृहराज्य मंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केला.

गृहराज्य मंत्री शंभुराज देसाई हे शिवसंपर्क अभियानानिमित्य रविवारी (ता.१८) परभणीत आले होते. त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्यानंतर देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (Shivsena Minister Sambhuraj Desai, Maharashtra) नुकतीच राष्ट्रवादी कॉग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीकडे राजकीय अर्थाने पाहिले जात आहे. त्याच बरोबर राज्यात मनसे व भाजप युतीच्या चर्चा ही रंगत आहेत.

या सर्व घडामोडीवर राज्यात शिवसेनाला काही धोका संभवू शकतो का ? या प्रश्नावर राज्यमंत्री देसाई म्हणाले, राज्यात शिवसेना पक्षाची स्थापना एका विचारसरणीतून झालेली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारावर चालणारी ही संघटना आज ही तितक्याच ताकदीने राज्यात उभी आहे. आजही लोकांच्या मना मनात शिवसेना अधिराज्य गाजवते आहे. त्यामुळे राज्यात कुणी - कुणाशी युती केली काय आणि हातमिळवणी केली तरी त्याचा कोणताही फरक शिवसेनेवर पडणार नाही.

राज्यात पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारची कामगिरी अत्यंत चांगली सुरु आहे. त्यामुळे अश्या चर्चांनी फरक पडणार नसल्याचेही ते म्हणाले. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून  १२ ते २४ जुलै दरम्यान राज्यभरात दौरे सुरु आहेत. त्या माध्यमातून संघटनात्मक वाढ करण्याचे काम केले जात आहे.

यातून शिवसेनेचा विचार सर्वसामान्य लोकापर्यंत पोहचविण्याचे काम देखील केले जात असल्याचे त्यांनी  सांगितले. यावेळी खासदार संजय जाधव, आमदार डॉ.राहूल पाटील, शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख विशाल कदम, माजी आमदार मीराताई रेंगे पाटील, सखुबाई लटपटे यांची उपस्थिती होती.

हे ही वाचा ः मनसेचा गनिमीकावा, भल्या पहाटे महापालिका आयुक्तांच्या बंगल्याचे कनेक्शन कट..

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख