कुणाला काय आरोप करायचे ते करू द्या, माझ्यावर ईडीची कारवाई होणार नाही..

मला ईडीचा धोका नाही, त्यामुळे त्यांच्या आरोपांना मी उत्तर देणार नाही, असेही परब यांनी स्पष्ट केले.
Shivsena Minister Anil Parab Press News Aurangabad
Shivsena Minister Anil Parab Press News Aurangabad

औरंगाबाद ः राज्यात सध्या ईडीच्या कारवायांची जोरदार चर्चा आहे. महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री ईडीच्या रडारवर असल्याचे सांगितले जाते. भाजप नेत्यांकडून तर अनेकदा असे दावे केले जातात. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने करावाई केल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांचे नाव प्रामुख्याने घेतले जात होते. (Let anyone do what they want, I will not be prosecuted by the ED.) मात्र आपल्यावर ईडीची कारवाई नाही आणि होणारही नाही, असा विश्वास परब यांनी औरंगाबादेत पत्रकारांशी बोलतांना केला.

परिवहन मंत्री अनिल परब हे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. पत्रकारांशी बोलतांना सहाजिकच त्यांच्यावर ईडीच्या कारवाईचा प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देतांना परब म्हणाले, अद्याप माझ्यावर ईडीकडून कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही, माझी चौकशी देखील नाही, भविष्यातही ती होणार नाही. ( Transport Minister Anil Parab Maharahstra) त्यामुळे विरोधकांना कितीही चर्चा करायची असली तर त्यांनी ती खुशाल करावी, मला ईडीचा धोका नाही, त्यामुळे त्यांच्या आरोपांना मी उत्तर देणार नाही, असेही परब यांनी स्पष्ट केले.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर न्यायालयाच्या आदेशाने तत्कालीन गृहमत्री अनिल देशमुख यांची सीबीआयने चौकशी सुरू केली होती. अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता. देशमुखांच्या राजीनाम्यानंतर भाजपकडून विशेषतः करीट सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्यांला राजीनामा द्यावा लागणार, असे वारंवार सांगितले जात होते.

परब यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचे आरोप देखील झाले होते.  त्यामुळे परब यांच्यावर देखील ईडीची कारवाई होणार याची चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. परंतु चर्चे पलीकडे परब यांच्या बाबतीत काही घडले नाही. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर पुन्हा परब यांचे नाव भाजपकडून चर्चेत आणले गेले.

आज जेव्हा ईडीच्या अनुषंगाने परबांवर भाजप व सोमय्या यांनी केलेल्या आरोपा संदर्भात विचारले तेव्हा, परबांनी भाजपला काय आरोप करायचे ते करू देत, पण मला ईडीचा धोका नाही, माझ्यावर ईडीची कारवाई नाही, होणारही नाही, याचा पुनरुच्चार केला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com