लातूर ग्रामीणला अर्थसंकल्प पावला, जलसंधारणाच्या योजनांसाठी १२ कोटींचा निधी

लातूर ग्रामीण मधील तब्बल ३९ जलसंधारणांच्या योजनांना मंजुरी देण्यात आली आहे.
Latur Gramin-Mla Dhiraj Deshmukh News- Budget
Latur Gramin-Mla Dhiraj Deshmukh News- Budget

लातूर : कोरोनाचे संकट राज्यावर पुन्हा ओढावले असतांना सादर झालेल्या बजेटमध्ये लातूर ग्रामीण मतदारसंघाला चांगला निधी मिळाला आहे. विशेषतः जलसंधारणाच्या कामांना हा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे कायम दुष्काळाच्या छायेत राहणाऱ्या लातूरच्या ग्रामीण भागात जलसंधारणाच्या कामांना आता गती येणार आहे.

देश आणि राज्यावर ओढावलेल्या कोरोना या जागतिक संकटामुळे राज्याची आर्थिकस्थिती बिघडली. यावर्षी त्यात थोडी सुधारणा झाली असली तरी विकासकामांसाठी म्हणावा तसा निधी देणे महाविकास आघाडी सरकारला जमले नाही. त्यातली प्राधान्य क्रम ठरवून नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात काही प्रमाणात तरतुदी आणि योजनांना मार्गी लावण्यात आले आहे.

मराठवाड्याती दुष्काळी जिल्हा म्हणून लातूर जिल्हा ओळखला जातो. पाण्याची टंचाई या जिल्ह्याच्या पाचवीला पुजलेली. अगदी रेल्वेने पाणी आणून लातूरकरांची तहान भागवावी लागते. जिल्ह्यातील जलसंधारणाच्या अनेक योजना निधी अभावी रखडल्या आहेत. या अर्थसंकल्पात विशेषःत लातूर ग्रामीण मधील तब्बल ३९ जलसंधारणांच्या योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. केवळ मंजुरीच नाही तर त्यासाठी १२ कोटी रुपयांची तरतूद  देखील अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

यात शून्य ते शंभर हेक्टर सिंचन क्षमतेच्या 39 योजनांचा समावेश असून यामुळे जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन होऊन सिंचन क्षमतेत वाढ होण्यास मदत होणार आहे. यात रेणापूर तालुक्यातील ०९, लातूर २६, औसा २ कामांचा समावेश आहे. यामुळे ८०४ स.घ.मी पाणीसाठा निर्माण होणार आहे. तर २०८ हेक्टर इतके सिंचन क्षेत्र वाढणार आहे. विहिरींतील तसेच भूगर्भातील पाणी पातळी वाढून या भागातील पाणी टंचाई दूर होण्यास देखील या योजनांमुळे मदत होणार आहे.

लातूर तालुक्यातील शिऊर, तांदुळजा येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा, गेटेड सिमेंट नाला बंधारा, मुरुड येथे ३ तर अंकोली, चिंचोलीराव, चिंचोलीराव वाडी, गादवड, निळकंठ, सारसा येथे प्रत्येकी एक बंधारा होईल. एकुर्गा येथे २, अंकोली येथे २, साखरा येथे ३, कानडी बोरगाव येथे २ तर मुरुड, करकट्टा, बोरगाव काळे, सारोळा येथे प्रत्येकी १ सिमेंट नाला बंधारे होणार आहेत.

रेणापूर तालुक्यातील बिटरगाव, चाडगाव, माकेगाव येथे गेटेड बंधारे तर माकेगाव येथे २, समसापूर येथे ३ आणि गरसुळी, बिटरगाव, धवेली, वाला येथे प्रत्येकी एक सिमेंट नाला बंधारा उभारला जाणार आहे. याशिवाय, औसा भागात भेटा आणि शिवली येथे प्रत्येकी १ सिमेंट नाला बंधारा बांधला जाणार आहे. लातूर ग्रामीणचे काॅंग्रेस आमदार धीरज देशमुख यांनी या योजना व निधीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com