राजीव सातव यांना अखेरचा निरोप; मुलगा पुष्पराज याने दिला मुखाग्नी

पक्षाच्या अध्यक्षा व नेत्या सोनिया गांधी यांच्या वतीने काँग्रेसचे प्रभारी के. एच. पाटील यांनी श्रद्धांजली वाहून राजीव सातव यांच्या जाण्यामुळे पक्षाची मोठी हानी झाल्याचे यावेळी सांगितले.
Congress Mp Let rajiv Satav News Hingoli
Congress Mp Let rajiv Satav News Hingoli

कळमनुरी : राज्यसभेचे खासदार तथा गुजरात प्रभारी अॅड. राजीव सातव यांना सोमवार (ता.१७) रोजी हजारो शोकाकुल नागरिकांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप देण्यात आला.  त्यांच्या पार्थीवाला मुलगा पुष्कराज सातव याने भडाग्नी दिला. (Last message to Rajiv Satav; Mukhagni was given by his son Pushparaj) यावेळी अनेकांना शोक अनावर झाला.  सातव यांच्या पत्नी डाॅ. प्रज्ञा, आई माजी मंत्री रजनी सातव यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेकांची यावेळी उपस्थिती होती. 

राजीव सातव यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन झाल्यानंतर रविवारी सायंकाळी त्यांचे पार्थिव कळमनुरी येथे त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले होते.  यावेळी पालकमंत्री वर्षा गायकवाड यांची देखील उपस्थिती होती. (State and out-of-state party functionaries were coming for Satav's last darshan.) पूर्णवेळ येथे उपस्थित होत्या. रात्रभर राज्य व राज्याबाहेरील पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सातव यांच्या अंतिम दर्शनासाठी येत होते.

सोमवारी साडेसात वाजता पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. कळमनुरी, हिंगोली लोकसभा मतदारसंघामधील नागरिकांनी सातव यांच्या अखेरच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.  या शिवाय अंत्यसंस्कारासाठी राज्यभरामधील विविध पक्षाचे नेते, मंत्री, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यांची उपस्थिती..

महाराष्ट्र राज्याचे प्रभारी के. एच. पाटील, महुसल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनीक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उर्जामंत्री नितीन राऊत, मंत्री असलम शेख, राज्यमंत्री विश्वजीत कदम, पूनर्वसन व मदत कार्यमंत्री विजय वडेट्टीवार, मंत्री सतेज पाटील, काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार अमर राजूरकर, गुजरात विधानसभेचे विरोधी पक्षनेते परेश धनानी, खासदार हेमंत पाटील, माजी खासदार तुकाराम रेंगे, आमदार माधवराव जवळगावकर, राजू नवघरे,  संतोष बांगर,  तानाजी मुटकुळे, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी खासदार अॅड. शिवाजी माने, माजी आमदार गजानन घुगे,  रामराव वडकुते, भाऊ पाटील, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. श्रीनिवास, सत्यजित तांबे, अमर खानापुरे, गुजरात युवक काँग्रेसचे मानसिंग डोड्या, संपत कुमार, नीरज कुंडल आदी काॅंग्रेस व इतर पक्षांचे नेते, पदाधिकारी सातव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजर होते.

सोनिया गांधींचा शोक संदेश..

पक्षाच्या अध्यक्षा व नेत्या सोनिया गांधी यांच्या वतीने काँग्रेसचे प्रभारी के. एच. पाटील यांनी श्रद्धांजली वाहून राजीव सातव यांच्या जाण्यामुळे पक्षाची मोठी हानी झाल्याचे यावेळी सांगितले. (On behalf of party president and leader Sonia Gandhi, Congress in-charge K. H. Patil paid tributes) तर खासदार राहुल गांधी यांच्या वतीने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी श्रद्धांजली वाहिली. तर प्रियंका गांधीच्या वतीने मंत्री अशोक चव्हाण यांनी श्रद्धांजली वाहिली तर जयप्रकाश दांडेगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने श्रद्धांजली वाहत दुःख व्यक्त केले. यावेळी उपस्थित नेत्यांनी राजीव सातव यांच्या आठवणीला उजाळा दिला.

नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनीही सातव यांना श्रद्धांजली वाहिली. (Rajiv Satav was felicitated on behalf of the police.) दरम्यान राजीव सातव यांना पोलिसाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.  यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी राजीव सातव अमर रहे अशा, घोषणा दिल्या. 

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com