लाव रे तो व्हिडीओ : क्षीरसागर काकांनी दाखविला, आता पुतण्याची बारी - Laav re to video: Uncle Kshirsagar showed, now it's Nephew's turn jp75 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

लाव रे तो व्हिडीओ : क्षीरसागर काकांनी दाखविला, आता पुतण्याची बारी

दत्ता देशमुख
गुरुवार, 2 सप्टेंबर 2021

शहरात व मतदार संघात गुंडगिरी, माफियागीरी, वाळू माफिया, गुटखा व मटका कसे वाढले आहेत. त्याला आमदार संदीप क्षीरसागरांचा वरदहस्त कसा आहे याकडे डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी  अंगुलीनिर्देश केला.

बीड : राज्याच्या राजकारणातले जेष्ठ पुतणे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ने राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा घडविली. त्यानंतर जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांची `सीडी`, अद्याप लागली नसली तरी चर्चेत आहे.(Laav re to video: Uncle Kshirsagar showed, now it's Nephew's turn) आता बीडच्या राजकारणातही ‘व्हिडीओ गेम’सुरु झाला आहे.

काका नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी ‘लावरे रे तो व्हिडीओ’म्हणत पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यावर हल्लाबोल केला. (Ncp Mla Sandip Kshirsagar Beed) आता पुतणे कोणता व्हिडीओ दाखविणार याकडे बीडकरांचे लक्ष आहे.

काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर व पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यातील राजकीय वैर बीडकरांसाठी नवे नाही. (Dr.Bharatbhushan Kshirsagar, Beed) आरोप - प्रत्यारोपासह कार्यकर्त्यांचे पत्रकावॉर बारमाही सुरु असते. आता नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी संदीप क्षीरसागर यांच्यावर सुडाचे राजकारण करत असल्याचा आरेाप केला.

तसेच पदाचा दुरुपयोग करत शहरातील विकास कामे जाणीवपूर्वक अडविल्याचाही आरोप केला. विशेष म्हणजे संदीप क्षीरसागर यांच्या अखत्यारितील कामांचे अपयश पुढे करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेत बीड मतदार संघातील रस्त्यांची दुरावस्था दाखविणारा व्हिडीओ लावला.

संदीप क्षीरसागर यांचे चुलत भाऊ डॉ. योगेश क्षीरसागर यांनीही संदीप क्षीरसागर यांच्यावर हल्लाबोल करताना ‘आमदार नेहमी मंत्र्यांसमोर वाकून उभे असतात’पण विकास कामांना निधी का आणत नाहीत, निधी आणत असतील तर कामे कुठे? असा खोचक सवालही उपस्थित केला आहे.

तर, डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी मतदार संघात व शहरात माफियागिरी, गुंडगिरी, वाळूमाफिया, मटका व गुटखा वाढण्याला स्थानिक आमदारांचे पाठबळ असल्याचा गंभीर आरोप केला. आता संदीप क्षीरसागर याला कसे उत्तर देणार हे पहावे लागेल.

हे ही वाचा ः त्या बारा जणांच्या यादीत तालिबानकडून प्रशिक्षण घेऊन आलेले नाहीत..

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख