त्या निलंबित झालेल्या पोलिसांच्या पाठीशी खोतकर; निलंबन रद्द करण्यासाठी गृहमंत्र्यांची भेट..

लोकप्रतिनिधींचा सन्मान राखला गेला पाहिजे, त्यांची अप्रितिष्ठा होता कामा नये, या मताचा मी आहे, परंतु दानवे यांच्या प्रकरणात पोलिसांकडून असे काहीच घडलेले नाही.
Shivsena Leader Arjun Khotkar- Raosaheb Danve News Jalna
Shivsena Leader Arjun Khotkar- Raosaheb Danve News Jalna

जालना ःभाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व  शिवसेनेचे माजी मंत्री अर्जून खोतकर यांच्यातील राजकीय वैर जिल्ह्याला नवे नाही.  लोकसभा निवडणुकीत दानवेंच्या विरोधात मैदानात उतरण्याची घोषणा केल्यानंतर तर या दोघांमधील संबंध अधिकच ताणले गेले होते. (Khotkar with the backing of those suspended policemen; Home Minister's visit to cancel suspension) त्यामुळे संधी मिळेल तेव्हा एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न या दोघांकडून केला जातो.

जाफ्राबाद येथील संपर्क कार्यालयाची झडती घेऊन बदनामी केल्याची तक्रार रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांपुर्वी जालना पोलिस अधिक्षकांकडे केली होती. (Shivsena Leader Arjun Khotkar) त्यानंतर तडकाफडकी दोन पोलिस उपनिरीक्षक व तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. आता या पोलिसांच्या समर्थनात अर्जून खोतकर मैदानात उतरले आहेत.

पोलिसांनी केलेल्या झाडाझडतीमुळे दानवे यांची कुठल्याही प्रकारची अप्रतिष्ठा झालेली नाही, त्यामुळे चुकीच्या पद्धतीने पोलिसांचे केलेले निलंबन रद्द करा, अशी मागणी खोतकर यांनी थेट गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन केली आहे. (Home Minister Dilip valse patil) त्यामुळे आता पुन्हा एकदा दानवे विरुद्ध खोतकर असा संघर्ष भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रावासहेब दानवे यांच्या संपर्क कार्यालयात जाफ्राबाद येथील पत्रकाराला मारहाण केल्या प्रकरणातील आरोप दडून बसल्याची माहिती जाफ्राबाद पोलिसांना मिळाली होती. (Central State Minister Raosaheb Dance) या माहितीवरून सदर पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दानवे यांच्या कार्यालायाची झडती घेतली होती. ११ जून रोजी झालेल्या या प्रकाराने संतापलेल्या दानवे यांनी पोलिस अधिक्षकांकडे लेखी तक्रार करून विना परवानगी संपर्क कार्यालयाची झडती घेऊन माझी बदनामी केल्याचे यात नमूद केले होते.

झाडाझडतीत काय हाती लागले याचा खुलासा करावा, तसेच संबंधित पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी दानवे यांनी १२ जून रोजीच्या पत्रात केली होती. त्यांनतर अवघ्या एका दिवसांत चौकशी करून पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांनी दोन पोलिस उपनिरीक्षक व तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. या प्रकरणाची जिल्ह्यात व राज्यात चर्चा झाली.

दानवेंची कुठलीही अप्रतिष्ठा झाली नाही..

राजकीय पक्षांनी देखील यावर काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आता शिवसेनेचे अर्जून खोतकर निलंबित पोलिस कर्मचाऱ्यांच्या पाठीशी  उभे राहिल्याचे दिसून आले आहे. लोकप्रतिनिधींचा सन्मान राखला गेला पाहिजे, त्यांची अप्रितिष्ठा होता कामा नये, या मताचा मी आहे, परंतु दानवे यांच्या प्रकरणात पोलिसांकडून असे काहीच घडलेले नाही, अशी सावध प्रतिक्रिया खोतकरांनी दिली होती.

त्यानंतर आता या पोलिस कर्मचाऱ्यांवर झालेली निलंबनाची कारवाई ही चुकीची आणि दबावापोटी झाली असल्याचे म्हणत त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची काल मुंबईत भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रकांत दानवे, सुधाकर दानवे हे देखील होते. खोतकर यांनी संबंधित पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर केलेली निलंबनाची कारवाई मागे घ्यावी, अशी विनंती गृहमंत्र्याकंडे केली आहे. यावर लवकरच प्रकरणाची संपुर्ण माहिती घेऊन योग्य निर्णय घेऊ, असा शब्द गृहमंत्र्यांनी खोतकर यांना दिल्याचे समजते.  

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com