कराडांची जनआशिर्वाद यात्रा, पण पदाधिकारी-कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल..

शहरातील आठ ते दहा पोलिस ठाण्यांमद्ये ८० हून अधिक भाजपच्या संयोजक पदाधिकाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Jan Ashirwad Rally filed Fir Aurangabad News
Jan Ashirwad Rally filed Fir Aurangabad News

औरंगाबाद ः केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्या जनआशिर्वाद यात्रेचे स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी स्टेज उभारून गर्दी जमवल्या प्रकरणी भाजपच्या ७० ते ८० संयोजकांवर विविध पोलिसा ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Karad's Janashirwad Yatra, but charges filed against office bearers and activists.) कराड-दानवे यांच्या जनआशिर्वाद यात्रेचे शुक्रवारी औरंगाबादेत आगमन झाले. केंद्रात कराड यांच्या रुपाने पहिल्यांदाच जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळाल्यामुळे त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी भाजपच्या वतीने करण्यात आली होती.

खास पारंपारिक वंजारी वेषभूषा, हलगी, ढोल-ताशे आणि फटाक्यांची आतषबाजी अशा उत्साहाच्या वातावरणात तब्बल ७५ ठिकाणी व्यासपीठ उभारून कराडांचे स्वागत करण्यात आले. शहरानंतर ग्रामीण भागात देखील हेच चित्र होते.( Central State Finance Minister Dr. Bhagwat Karad) राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्यापही सार्वजनिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यावर बंदी आहे. तरीही सर्वच राजकीय पक्षांकडून जाहीर मेळावे, कार्यक्रम घेतले जात आहेत.

भाजपच्या वतीने १६ ते २१ आॅगस्ट दरम्यान, डाॅ. भागवत कराड यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांमधून जनआशिर्वाद यात्रा काढण्यात आली. (Bjps Jan Ashirwad Rally) औरंगाबादेत शुक्रवारी ही यात्रा दाखल झाली होती. यासाठी चिकलठाणा, मुकुंदवाडी, सिडको, गारखेडा, क्रांतीचौक, सिटीचौक, हडकोसह ग्रामीण भागात देखील ही यात्रा गेली. या सर्व भागांमध्ये डाॅ. कराड-दानवे यांचे भल्लेमोठे हार घालून स्वागत करण्यात आले.

यासाठी खास क्रेन लावण्यात आले होते. यावेळी पदाधिकारी-कार्यकर्त्यांची मोठी गर्दी देखील झाली होती. कोरोनाचे कुठलेच नियम या दरम्यान पाळण्यात आले नाही.  काल कन्नडमध्ये जनआशिर्वाद यात्रेचा समारोप झाल्यानंतर आज शहरातील आठ ते दहा पोलिस ठाण्यांमद्ये ८० हून अधिक भाजपच्या संयोजक पदाधिकाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, पोलिसांनी सत्ताधारी पक्षाच्या दबावातून हे गुन्हे दाखल केल्याचा आरोप केला आहे. काही दिवसांपुर्वी युवासेना, काॅंग्रेसच्या वतीने शहरात मेळावे घेऊन गर्दी जमवण्यात आली होती. मात्र एकाही सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेत सहभागी कार्यकर्त्यांवर मात्र गुन्हे दाखल करण्यात आले असून हा सूडभावनेचा प्रकार असल्याचा आरोप देखील भाजपकडून केला जात आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com