शिवसेनेवर दबाव आणू शकतील एवढी कराडांची क्षमता नाही.. - Karads do not have the capacity to put pressure on Shiv Sena. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

शिवसेनेवर दबाव आणू शकतील एवढी कराडांची क्षमता नाही..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 12 जुलै 2021

अंबादास दानवे जिल्हाप्रमुख असल्यामुळे त्यांनी याचे नियोजन केले आहे. आम्ही दोघेही शिवसंपर्क मोहिम राबवत आहोत.

औरंगाबाद ः नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारामध्ये स्वातंत्र्यानंतर औरंगाबादला पहिल्यांदाच मंत्रीपदाची संधी मिळाली. राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झालेल्या डाॅ. भागवत कराड यांना थेट अर्थ खात्याचे राज्यमंत्रीपद मिळाले. (Karads do not have the capacity to put pressure on Shiv Sena.) या मंत्रीपदावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत, त्यापैकीच एक म्हणजे औरंगाबादेत शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने कराड यांना मंत्रीपदाच्या माध्यमातून बळ दिल्याची चर्चा आहे.

यावर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेवर दबाव आणू शकेल इतकी डाॅ. कराड यांची क्षमता नाही, शिवसेनेला कुणीच दाबू शकत नाही. (Shivsena Leader Chandrakant Khaire) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचे विचार या शहराला आणि जिल्ह्याला दिले आहेत, त्यामुळे शिवसेनेला शह देण्याची किंवा रोखण्याची हिमंत कुणातच नाही, असे  खैरे यांनी म्हटले आहे.

प्रसार माध्यमांशी बोलतांना खैरे म्हणाले, मी चारवेळा जिल्ह्याचा खासदार म्हणून निवडून आलो, तेव्हा मला मंत्रीपदाची संधी होती, परंतु स्थानिक पातळीवर भाजप व इतरांनी माझ्या नावाला विरोध केला. (Bjp Central State Minister Dr.Bhagwat Karad) तो कुणीकुणी केला हे मला माहित आहे, पण आता त्यावर बोलण्यात अर्थ नाही. स्वातंत्र्यांनतर पहिल्यादांच जिल्ह्याला मंत्रीपद मिळाले असेल, पण मला विरोध केला नसता तर ते याआधीच मिळाले असते  असा दावा खैरे यांनी केला.

गटबाजी नाही, संपर्क मोहिमेत माझाही सहभाग..

जिल्ह्यातील शिवसंपर्क मोहिमेवरून गटबाजीचे होत असलेले आरोप देखील खैरे यांनी फेटाळून लावले. जिल्ह्यात व राज्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसंपर्क मोहिम सुरू आहे. अंबादास दानवे जिल्हाप्रमुख असल्यामुळे त्यांनी याचे नियोजन केले आहे. आम्ही दोघेही शिवसंपर्क मोहिम राबवत आहोत, वेळ मिळेल तसा मी देखील ग्रामीण भागातील मोहिमेत सहभागी होणार आहे, त्यामुळे आमच्यात कुठलीही गटबाजी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

एमआयएमने औरंगाबाद महापालिकेचा पुढचा महापौर आमच्या पक्षाचा असेल असा दावा केला आहे, यावर त्यांचे स्वप्न कधीच पुर्ण होणार नाही, महापालिकेवर व या जिल्ह्यावर कायम हिंदुंचा भगवा फडकत आला आहे, यापुढेही तो असाच फडकत राहील, इतर कुठल्याही रंगाचा झेंडा इथे फडकणार नाही, आम्ही फडकू देणार नाही, याचा पुनरुच्चार देखील खैरे यांनी यावेळी केला. 

हे ही वाचा ः रावसाहेब दानवेंच्या साथीने कराडांची गाडी दिल्लीच्या यार्डात..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख