रावसाहेब दानवेंच्या साथीने कराडांची गाडी दिल्लीच्या यार्डात..

गोऱ्ह्यांच्या तोंडात हात घालून त्याचे दात मोजने असो, की नांगर, बैलगाडी हाकणे, गायीची धार काढणे असो, दानवेंचा हा शेतकरी अवतार नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे.
Bjp Minister Raoshaeb Danve-Dr. Bhagwat Karad News Jalna
Bjp Minister Raoshaeb Danve-Dr. Bhagwat Karad News Jalna

भोकरदन ः मोदी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा देशभरात झाली. महाराष्ट्र विशेषतः मराठवाड्यातून काही अनपेक्षित नावे या विस्तारात दिसली. यात प्रामुख्याने खासदार भागवत कराड यांची लागलेली वर्णी नव्या संघर्षाची नांदी ठरते की काय? अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. (Karad's car with Raosaheb Danve in the yard of Delhi) तर दुसरी चर्चा झाली ती केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कथित राजीनाम्याची. पण राजकारणात चकवा देण्यासाठी प्रसिध्द असलेल्या रावसाहेबांनी यावेळीही आपल्या विरोधकांना चकवा दिला.

तर मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर सध्या नवनिर्वाचित केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ.भागवत कराड व रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची जोरदार चर्चा सुरू आहे. यातच या दोन मराठवाड्यातील एक आगळा वेगळा फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Bjp Central State Minister Raosaheb Danve) या फोटोमध्ये रावसाहेब दानवे हे बैलगाडी हाकत आहेत, आणि त्यांच्या पाठीला पाठ लावून डाॅ. कराड हे बसलेले आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीला साजेसे हे छायिचत्र म्हणावे लागेल.

रावसाहेब दानवे यांच्या साथीनेच कराड यांची गाडी दिल्लीच्या यार्डात पोहचली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. रावसाहेब दानवे हे गेल्या ४०-५० वर्षापासून राजकारणात आहेत. अगदी जनसंघ, जनता पार्टी आणि त्यानंतरच्या भाजपची राजकीय वाटचाल त्यांनी पाहिली आहे. (Bjp Central State Minister Dr. Bhagwat karad) सरपंच ते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रीपदा पर्यंतचा त्यांचा प्रवास कुणालाही भूरळ पाडेल असाच म्हणावा लागेल.

तर वर्षभरापुर्वी राज्यसभेवर खासदार आणि वर्ष सरत नाही तोच केंद्रात अर्थ खात्याचे राज्यमंत्री अशी उतुंग झेप घेणारे कराड हे देखील संघ आणि भाजपच्या पठडीत तयार झालेले शांत स्वभावाचे गृहस्थ. नगरसेवक, उपमहापौर, महापौर, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष, विधानसभा आणि राज्यसभेमार्गे केंद्रात मंत्रीपदाला गवसणी घालणारे औरंगाबादेतील एक नाव. ३०-३५ वर्षांपासून राज्य व केंद्रीय नेत्यांसोबत संपर्क आलेले कराड दिल्लीतील राजकीय डावपेच आणि जातीची समीकरणे यामुळे मंत्री झाले.

कराड-दानवेंची गट्टी जमणार?

रावसाहेब दानवे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असतांना कराड हे प्रदेश उपाध्यक्ष होते. त्यामुळे या दोन नेत्यांचा कायम संपर्क आलेला. तर या दोघांचा एकत्रित फोटो तेही दोघे केंद्रात मंत्री झाल्यानंतर चांगलाच व्हायरल होत आहे. रावसाहेब दानवे हे खासदार, मंत्री असले तरी आपला साधेपणा, रांगडी ग्रामीण भाषा, आणि तल्लख विनोदी बुद्धीमुळे ओळखले जातात. मुळचे शेतकरी असलेले दानवे यांचे शेतीप्रमे काही लपून राहिलेले नाही.

मग गोऱ्ह्यांच्या तोंडात हात घालून त्याचे दात मोजने असो, की नांगर, बैलगाडी हाकणे, गायीची धार काढणे असो, दानवेंचा हा शेतकरी अवतार नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे.  मध्यंतरीच्या काळात कोरोनामुळे कुठेच बाहेर जाता येत नव्हते तेव्हा, दानवे यांनी बहुतांश वेळ हा आपल्या भोकरदन जवळील नळणीच्या शेतात घालवला. नदीच्या काठावर असलेल्या या शेतात दानवे नेहमीच रमतात.

गेल्या महिन्यात योगायोगाने डाॅ. भागवत कराड दानवेंच्या नळणीच्या शेतात आले होते. तेव्हा दानवेंनी त्यांना बैलगाडीची सैर घडवून आणली होती. दानवे बैलगाडी चालवत होते, तर कराड पाठमोरे बसले होते.  तेव्हा दोघांनाही कदाचित याची जाणीव नसावी की लवकरच केंद्रात मंत्री म्हणून देखील आपल्याला सोबत काम करावे लागणार आहे. एकीकडे कराडांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश झाल्याची चर्चा तर दुसरीकडे दानवे यांची मंत्रीमंडळातून गच्छंती झाल्याची चर्चा प्रसार माध्यमांमध्ये रंगली होती.

पण दानवे यांनी आपले मंत्रीपद तर साबूत राखलेच पण रेल्वे मंत्रालयासारखे महत्वाचे खाते पदरात पाडून घेत दिल्लीसह राज्यातील मिडिया व आपल्या विरोधकांनाही चकवा दिला. आता पुढील तीन वर्ष दानवे आणि कराड ही जोडी जशी बैलगाडीत एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून बसलेली दिसते, तसेच हे दोघे आपल्याला मिळालेल्या मंत्रीपदाचा लाभ मराठवाडा आणि मतदारसंघासाठी करून घेतील, ही अपेक्षा निश्चितच बाळगायला हरकत नाही.  

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com