कराडांना नगरसेवक, महापौर मी केले; त्यांना भेटायला कशाला जाऊ?

राज्यसभेवर कराड यांची खासदार म्हणून निवड झाल्यानंतर खैरे यांनीस्वतः फोन करून कराडांना आपल्या संपर्क कार्यालयावर भेटीचे आमंत्रण दिले होते.
Shivsena Leader Chandrakant Khaire-Dr. Bhagwat Karad News Aurangabad
Shivsena Leader Chandrakant Khaire-Dr. Bhagwat Karad News Aurangabad

औरंगाबाद ः  केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांना शुभेच्छा देण्यासाठी दिल्लीत अजूनही जिल्ह्यातून अनेकजण जातात. मात्र या जिल्ह्याचे लोकसभेत वीस वर्ष प्रतिनिधित्व केलेले व शिवसेना भाजप युती असतांना खांद्याला खांदा लावून काम केलेले शिवसेना नेते यांनी मात्र आपल्या या जुन्या मित्राला साध्या शुभेच्छा देखील दिल्या नाहीत. (Karad was made a corporator, a mayor; Why go to meet them?) यावर भागवत कराड यांना मी नगरसेवक केले, दोनवेळा बाळासाहेबांच्या आशिर्वादाने महापौर केले, मग त्यांना भेटायला मी का जाऊ?  तेच  मला भेटायला येतील, असा दावा केला आहे.  

राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून गेली २५-३० वर्ष युती असलेले शिवसेना-भाजप या दोन मित्रांमध्ये चांगलेच वितुष्ट आले आहे. मोदी सरकारमधील मंत्रीमंडळ विस्तारामध्ये वर्षभरापुर्वीच खासदार झालेल्या डाॅ. भागवत कराड यांना थेट केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पदाची लाॅटरी लागली. (Central State Fianance Minister Dr.Bhagwat Karad) त्यांच्यावर महिना झाला तरी शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. दिल्लीत त्यांच्या बंगल्यावर भेटायला येणाऱ्यांची गर्दी कमी होत नाहीये.

मात्र महापालिका,विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत युती म्हणून सोबत काम केलेल्या आपल्या सहकाऱ्याला शुभेच्छा देण्याचा मनाचा मोठेपणा वीस वर्ष खासदार राहिलेल्या शिवसेना नेते खैरेंनी दाखवू नये याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. (Shivsena Leader Chandrakant Khaire, Aurangabad) राज्यसभेवर कराड यांची खासदार म्हणून निवड झाल्यानंतर खैरे यांनी आगामी महापालिका निवडणूका लक्षात घेता डाॅ. कराड यांना स्वतः फोन करून आपल्या संपर्क कार्यालयावर भेटीचे आमंत्रण दिले होते.

कराड यांचे पेढा भरवून स्वागत करणाऱ्या खैरे यांनी ते मंत्री झाल्यावर मात्र त्यांना शुभेंच्छांचा फोन किंवा दिल्लीत असून भेट देखील घेतली नाही. औरंगाबादला स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा केंद्रात मंत्रीपद मिळाले, असतांना खैरे यांनी कराडांचे साधे अभिनंदनही करू नये याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

यावर ई सकाळला दिलेल्या मुलाखतीत बोलतांना खैरे म्हणाले, दिल्लीत मी मतदारसंघातील विकासकामांचे प्रश्न घेऊन नेहमीच जात असतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपच्या अनेक मंत्र्यांशी माझे अजूनही चांगले संबंध आहेत. वीस वर्ष खासदार म्हणून काम केल्यामुळे दिल्लीतील माझा संपर्क कायम आहे.

राहिला प्रश्न कराड यांना भेटण्याचा किंवा शुभेच्छा देण्याचा, तर ते राजकारणात मला खूप ज्युनिअर आहेत. त्यांना नगरसेवक आणि महापालिकेत दोनवेळा महापौर मीच बाळासाहेबांच्या आशिर्वादाने केले होते. ते आता खासदार आणि केंद्रात मंत्री झाले असतील, पण मी त्यांना भेटायला का जाऊ? तेच मला भेटायला येतील, असा दावाही खैरे यांनी केला. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com