कराडांकडे ८२ तोळे सोने, ५२ एकर शेतीसह महागड्या गाड्या..

रमेश कराड यांच्याकडे जंगम आणि स्थावर अशी एकूण ५ कोटी ३६ लाख २८ हजार ६६३ रुपयांची संपत्ती, तर त्यांच्या पत्नी संजिवनी यांच्या नावावर देखील २ कोटी ९ लाख ४६ हजार ९०२ एवढी संपत्ती असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
bjp mlc candidate karad property news
bjp mlc candidate karad property news

औरंगाबादः भाजपने नांदेडच्या डॉ. अजित गोपछडे यांची उमेदवारी बदलून लातूरच्या रमेश कराडांना विधान परिषदेवर संधी देण्याचा निर्णय घेतला. माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक अशी  ओळख असलेले रमेश कराड कोट्याधीश असून सोने, महागड्या गाड्या आणि शेती अशी संपत्ती त्यांच्या नावे आहे. एवढेच नाही तर त्यांच्या पत्नी संजिवनी या देखील कोट्याधीश असून त्यांच्या नावेही स्थावर आणि जंगम मालमत्ता मोठ्या प्रमाणात आहे. रमेश कराड यांच्याकडे जंगम आणि स्थावर अशी एकूण ५ कोटी ३६ लाख २८ हजार ६६३ रुपयांची संपत्ती, तर त्यांच्या पत्नी संजिवनी यांच्या नावावर देखील २ कोटी ९ लाख ४६ हजार ९०२ एवढी संपत्ती असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या ९ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भाजपने चार उमेदवारांची यादी जाहीर केली होती. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपने आधी जाहीर केलेल्या नांदेडचे डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी मागे घ्यायला लावली, आणि त्यांच्या जागेवर लातूर भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश कराड यांना उमेदवारी दिली. भाजपच्या या धक्कातंत्राने अनेकांना धक्का बसला. माजी मंत्री पंकजा मुंडे यांना डावलून वंजारी समाजातील त्यांच्याच समर्थकाला विधान परिषदेची संधी देत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी वेगळीच खेळी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजपने उमेदवारी दिलेले रमेश कराड हे तगडे आणि धनाढ्य उमेदवार असल्याचे समोर आले आहे.

निवडूक अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रातील विवरणानूसार रमेश कराड यांच्याकडे रोख रक्कम, विविध बॅंकामधील गुंतवणूक, शेअर्स, विमा, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र यासह ५३ तोळे सोने अशी एकूण २ कोटी ४९ लाख ४८ हजार ८७२ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. ३२ लाखांच्या महागड्या कारसह ट्रॅक्टर, बस अशी वाहने देखील कराड बाळगून आहेत. या शिवाय ३९ एकर ९ गुंठे शेतजमीन, एमआयडीसी व इतर भागामध्ये प्लॉट, कमर्शियल इमारत, बंगला अशी एकूण २ कोटी ८६ लाख ७९ हजार ७९१ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर कराड यांना विविध बॅंका व वित्तिय संस्थांची एकूण १ कोटी ३५ लाख ४७ हजार २०२ रुपयांची देणी असल्याचे त्यांनी शपथ पत्रात नमूद केले  आहे.

पत्नी करोडपती, तर मुलगा लखपती..

रमेश कराड यांच्या प्रमाणेच त्यांच्या पत्नी संजिवनी या देखील करोडपती असून त्यांच्या नावे रोख रक्कमेसह २९ तोळे सोने, फॉर्च्यूनर कार, ट्रॅक्टर, बॅंकेतील शेअर्स, विमा, बचत प्रमाणपत्रांमधील गुंतवणूक अशी एकूण ८८ लाख ६६ हजार ७६२ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर १३ एकर ३९ गुंठे शेत जमीनीसह ३२ लाखांच्या बिगरशेत जमीनी म्हणजे प्लॉट आणि ४९ लाखांची कमर्शियल इमारत अशी जंगम आणि स्थावर मिळून एकूण २ कोटी ९ लाख ४६ हजार ९०२ एवढी संपत्ती आहे. या शिवाय कराड यांच्या मुलांच्या नाववर देखील लाखो रुपयांची मालमत्ता दर्शवण्यात आली आहे. संजिवनी कराड यांना बॅंक व इतर वित्तीय संस्थांची ६४ लाख १४ हजार ३४८, तर त्यांच्या मुलांना २९ लाख ८३ हजारांची देणी आहेत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com