कराड, दानवे आपलेच; आता चिंता नाही..

शिवाजीनगर येथील भुयारी मार्ग हा गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेला प्रश्न सोडवण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करतो आहे.
Mp imtiaz jalil -Danve-Karad news aurangabad
Mp imtiaz jalil -Danve-Karad news aurangabad

औरंगाबाद ः केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे आपलेच आहेत, आपल्या भागातले आहेत. त्यामुळे आता चिंता करण्याचे कारण नाही. जिल्ह्यासह मराठवाड्यातील रेल्वे प्रश्न तातडीने मार्गी लागतील. (Karad, Danve is yours; No worries now, Said, Mim Mp Imtiaz Jalil) दानवे रेल्वे मंत्री असल्याने ते या कामांना प्राधान्य देतील आणि निधीची अडचण आली तर कराड साहेब ती सोडवतील, असा चिमटा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी काढला.

केंद्रात मराठवाड्याला मंत्रीमंडळ विस्तारात चांगली खाती मिळाल्यामुळे सगळ्यांच्याच आशा पल्लवीत झाल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्या कित्येक वर्षापासून मराठवाड्यातील प्रलंबित रेल्वे प्रश्न आता रुळावर येण्याची शक्यता दानवे यांच्या मंत्रीपदामुळे निर्माण झाली आहे. (Central State Minister Raosaheb Danve) तर अर्थ खात्याचे राज्यमंत्री म्हणून औरंगाबादच्याच कराड यांना संधी मिळाल्याने निधी अभावी मराठवाड्यातील विकास प्रश्न रखडले,  ( Central State Minister Dr.Bhagwat Karad) असे म्हणण्याची वेळ आता येणार नाही, असा विश्वास सर्वच राजकीय पक्षांनी व्यक्त केला आहे.

बीजेपीची बी टीम म्हणून हिणवण्यात येणाऱ्या एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी देखील कराड, दानवे यांचा उल्लेख करत आता चिंता नाही, असा टोला लगावला आहे. इम्तियाज जलील यांनी नुकतीच दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन शहरातील उड्डाणपुल व इतर प्रश्नांवर त्यांच्याशी चर्चा केली. या बैठकीची माहिती आणि मार्गी लागलेल्या प्रश्नांची माहिती देत असतांना त्यांनी शिवाजीनगर रेल्वे भुयारी मार्गाचा विषय काढला.

या संदर्भात देखील आपण रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली असून या भुयारी मार्गाचा प्रश्न लवकरच निकाली निघणार असल्याचे सांगितले. इम्तियाज जलील म्हणाले, शिवाजीनगर येथील भुयारी मार्ग हा गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेला प्रश्न सोडवण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करतो आहे. याआधी देखील रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून काम मार्गी लावण्यासाठी रेटा लावला होता. राज्य सरकारने आपला वाटा देण्याची तयारी दाखवली आहे.

रेल्वे बोर्डाने देखील या प्रस्तावाला हिरवा झेंडा दाखवला आहे. शिवाय केंद्रातील रेल्वे खाते आपल्या भागातील खासदार रावसाहेब दानवे यांच्याकडे आले आहे. तर अर्थ राज्यमंत्री पद देखील डाॅ. भागवत कराड यांच्याकडे आहे. त्यामुळे भुयारी मार्गाच्या प्रस्तावात काही अडचण आलीच तर ती दानवे सोडवतील. निधीचा काही प्रश्न निर्माण झाला, तर तो डाॅ. कराड साहेब सोडवतील, असेही ते म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com