कन्नड-चाळीसगांव घाट चोवीस तासांपासून बंदच; चार राज्यातील वाहतूकीवर परिणाम

काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून पीके पुर्णपणे उद्धवस्त झाल्याचे सांगितले जाते.
कन्नड-चाळीसगांव घाट चोवीस तासांपासून बंदच; चार राज्यातील वाहतूकीवर परिणाम
Kannad Taluka Heavy Rain News Aurangabad

औरंगाबाद ः अतिवृष्टी आणि कन्नड-चाळीसगांव घाटात पाच ठिकाणी दरड कोसळ्यामुळे औरंगाबाद-धुळे महामार्गावरील वाहतूक गेल्या चोवीस तासांपासून ठप्प झाली आहे. कन्नड-चाळीसगांव घाटात काल रात्री दहा वाजेपासून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. (Kannada-Chalisgaon Ghat closed for 24 hours; Impact on transportation in four states) साधरणता साडेचार किलोमीटर पर्यंत या रांगा असल्याचे सांगितले जाते.

घाटातील वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन मदतकार्याला वेग देण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Kannad-Chalisgaon Ghat) वाहतूक ठप्प झाल्याने मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात व दिल्ली या चार राज्यात जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाल्याचे बोलले जाते.

या चार राज्यातील अनेक मोठी वाहने याच कन्नड-चाळीसगांव घाटातून जात असतात. साडे चौदा किलोमीटर लांबीचा हा घाट पाच ठिकाणी दरड कोसळ्यामुळे सध्या बंद आहे. (Heavy Rain In seven Sarkal In Kannad Taluka) काल रात्री उशीरा कन्नडकडून सुरू होणाऱ्या घाटात तीन ते चार किलोमीटरवर तीन ठिकाणी दरड कोसळल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तर खालच्या बाजुने देखील दोन ठिकाणी दरड कोसळली आहे.

या अपघतात एक दरड एक ट्रकवरच कोसळल्याने ही ट्रक चालकासह दीडशे ते दोनशे फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती आहे. मदतकार्य सुरू असून काही तासात घाट वाहतुकीसाठी खुला होईल असे सांगितले जात आहे. सध्या पर्यायी मार्ग म्हणून शिऊर बंगला, नांदगाव मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सात मंडळात अतिवृष्टी..

कन्नड तालुक्यातील बहुतांश मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. काही ठिकाणी ८६ ते १२० मि.मी. पावसांची नोंद झाली आहे. तालुक्यातील दोन पाझर तलाव फुटल्याने आसपासच्या व नदीकाठच्या भागातील घरात पाणी घुसले असून टपऱ्या, जनावरे वाहून गेल्याची माहिती आहे. या शिवाय काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून पीके पुर्णपणे उद्धवस्त झाल्याचे सांगितले जाते.

अद्रक, कापूस, मका ही चांगली बहरलेली पीक अतिवृष्टीमुळे पार झोपली आहेत. घरात शिरलेले पाणी व त्यातून सुखरूप बाहेर निघण्याला नागरिकांनी प्राधान्य दिल्यामुळे शेतीतील नुकसानीकडे अद्याप कुणाचे फारसे लक्ष गेलेले नसले तरी शेतांमध्ये गुढघ्या इतके पाणी साचल्याचे चित्र आहे. कन्नड तालुक्यातील या भयावह परिस्थितीचा राज्य सरकारने देखील आढावा घेतला असून नागरिकांना तातडीने आवश्यक मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in