हात जोडून विनंती करतो, कोरोनामुक्तीसाठी सहकार्य करा..

जनतेचा सहभाग आणि सहकार्य असेल तरच लॉकडाऊन यशस्वी होऊन आपण कोरोना संसर्गाची साखळी तोडू शकतो. वाढलेली रुग्ण संख्या कमी करणे हा आपला प्रमुख उद्देश आहे. लॉकाडाऊनची घोषणा करण्यापुर्वी पुरेसा वेळ लोकांना जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी देण्यात आला होता. सगळ्यांनी त्या खरेदी करून ठेवल्या असतीलच.
subhash deasi apeeal to aurangabadkars news
subhash deasi apeeal to aurangabadkars news

औरंगाबादः कोरोनाची वाढती रुग्ण संख्या आणि संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आपल्याला पुन्हा लॉकडाऊन करावे लागत आहे. कुणाला त्रास देण्याचा या मागे हेतू नाही, तर जिल्ह्याला आणि शहराला या महामारीतून मुक्त करण्याच्या उद्देशानेच लॉकडाऊनची गरज होती. उद्यापासून केल्या जाणाऱ्या कडक लॉकडाऊनचे जनतेने हे आपल्यावरचे बंधन नाही, तर आपल्या व कुटुंबाच्या आरोग्यासाठी घेतलेला निर्णय समजून याचे पालन करावे, मी हात जोडून विनंती करतो, शहराला आणि जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नागरिकांना केले.

लॉकडाऊन आणि महापालिका व जिल्ह्यातील इतर उपयायोजनांचा आढावा घेण्यासाठी सुभाष देसाई औरंगाबादेत आले आहेत. उद्याच्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लोकांना कळकळीचे आवाहन करत हा लॉकडाऊन यशस्वी करण्याचे आवाहन केले. सुभाष देसाई म्हणाले, मिशन बिगीन अगेन अंतर्गत आपण लॉकडाऊनमध्ये काही शिथिलता दिली होती.

त्यामुळे व्यापार, उद्योग, धंदे आणि दळणवळणाला काही प्रमाणात चालना मिळाली होती. थांबलेले अर्थचक्र पुन्हा सुरळीत करणे हा त्यामागचा हेतू होता. या निर्णयाने लोकांच्या हाताला काम मिळाले आणि काही प्रमाणात जनजीवन पुर्वपदावर येण्यास मदत देखील झाली. पण नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने एकमेकांशी संपर्क वाढला आणि त्यातून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढली.

कोरोनाची साखळी तयार झाल्यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढले आणि या सगळ्या परिस्थितीची माहिती आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली. त्यांनी ही या परिस्थिती बाबत चिंता व्यक्त करत शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही हे सांगत लॉकडाऊन करण्याच्या सूचना दिल्या. नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागला. पण आता हा लॉकडाऊन आपल्यावर शासनाने लादलेले बंधन आहे,  असे न समजता आपल्या व कुटुंबाच्या हितासाठी आणि आरोग्याच्या काळजीपोटी हा कठोर निर्णय घेण्याता आला आहे, हे समजून घेतले पाहिजे.

जनतेचा सहभाग आणि सहकार्य असेल तरच लॉकडाऊन यशस्वी होऊन आपण कोरोना संसर्गाची साखळी तोडू शकतो. वाढलेली रुग्ण संख्या कमी करणे हा आपला प्रमुख उद्देश आहे. लॉकाडाऊनची घोषणा करण्यापुर्वी पुरेसा वेळ लोकांना जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी देण्यात आला होता. सगळ्यांनी त्या खरेदी करून ठेवल्या असतीलच.

त्यामुळे आता कुणीही घराबाहेर पडू नये, असे मी कळकळीने सांगतो आहे. पुढील दहा दिवस प्रत्येकाने घरातच राहून प्रशानसाला सहाकार्य करावे, कुठल्याही कारणासाठी बाहेर पडू नये. असे झाले तरच आपण कोरोनाची साखळी तोडू शकतो. शहर आणि जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे,  असे आवाहन सुभाष देसाई यांनी जनतेला केले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com