जालन्याला मेडिकल काॅलेज मिळत नाही तोपर्यंत टोपेंचा सत्कार करणार नाही..

टोपे भैय्याचे काम चांगले आहे, त्याबद्दल त्यांचे सगळीकडे कौतुक केले जाते, आम्हालाही त्यांचे कौतुक आणि अभिमान आहे. पण तरी मी त्यांचा सत्कार करणार नाही.
congress mla kailsh gorantyal news jalna
congress mla kailsh gorantyal news jalna

जालना ः काॅंग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी एका कार्यक्रमात बोलतांना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या कामाचे, त्यांनी कोरोना काळात आरोग्य विभागाची हाताळलेली जबाबदारी याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. (Jalna will not be honored with a hat until he gets a medical college, said Congress Mla Kailash Gorantyal, Jalna) पण हे करत असतांनाच तरीही आपण त्यांच्या सत्कार करणार नाही अशी भूमिका घेतली. पण या मागे त्यांची एक मागणी कारणीभूत आहे.

मराठवाडा व राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुर झाले आहे. मात्र आरोग्य मंत्री जालन्याचे असून देखील शहराला मात्र अद्याप मेडिकल काॅलेज मिळालेले नाही, अशी खंत व्यक्त करत गोरंट्याल यांनी जालन्याला मेडिकल काॅलेज मिळत नाही तोपर्यंत, टोपेंचा सत्कार करणार नाही, असे जाहीर केले. (Health Minister Rajesh Tope Maharashtra) जालन्याच्या राजकारणात सर्वच पक्षाचे नेते व लोकप्रतिनिधी एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यामुळे इथे राजकारणही मैत्रीपुर्ण असते.

नगरपालिका, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत कुणी काय भूमिका घ्यायची, कुणाला कशी मदत करायची हे ठरलेले असते. त्यामुळे इथे बहुदा मोठा वाद होत नाही.  राजेश टोपे, कैलास गोरंट्याल, शिवसेनेचे अर्जून खोतकर हे तर एकमेकांचे चांगले मित्र म्हणून ओळखले जातात. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असतांना जिल्ह्याला आरोग्य खात्याचे मंत्री पद मिळाले. राजेश टोपे यांच्यावर राष्ट्रवादीने ही जबादारी सोपवली.

कोरोनाच्या महामारीत टोपे यांनी अत्यंत कुशलतेने आरोग्य विभागाचा कार्यक्रम हाताळला. त्यांच्या या कामाचे कौतुक राज्य व देश पातळीवर देखील झाले. याचा दाखला देत आमदार गोरंट्याल यांनी आपल्या भाषणात एक लाडीक तक्रार देखील केली. विशेष म्हणजे राज्यातील वैद्यकीय शिक्षण खाते हे काॅंग्रेसकडे असतांना मेडिकल काॅलेजची मागणी गोरंट्याल यांनी टोपेंकडे केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या खऱ्या, पण त्यावर त्यांनी तात्काळ खुलासाही केला. 

अमित देशमुखांनी जालन्याच्या मेडिकल काॅलेजला मान्यता दिली असली तरी आरोग्य विभागाकडून त्या संदर्भातील कारवाई अद्याप झालेली नाही, याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. टोपे भैय्याचे काम चांगले आहे, त्याबद्दल त्यांचे सगळीकडे कौतुक केले जाते, आम्हालाही त्यांचे कौतुक आणि अभिमान आहे. पण तरी मी त्यांचा सत्कार करणार नाही. जालना सोडून मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याला मेडिकल काॅलेज मिळाले आहे, परभणीला न मागता मिळाले, मात्र आमची मागणी असून देखील ते मिळत नाही.

राजेश टोपे यांनी जालन्याला मेडिकल काॅलेज मिळवून दिल्यानंतरच आपण त्यांच्या सत्कार करू. मेडिकल काॅलेजसाठी लागणारी जागा उपलब्ध आहे, वैद्यकीय मंत्री अमित देशमुख, वैद्यकीय संचालनालयाने देखील या संदर्भातील कारवाई सुरू केली आहे, पण आरोग्य मंत्र्यांच्या विभागाकडून काही गोष्टींची पुर्ताता होणे आवश्यक आहे. तेव्हा त्यांनी ती ताडीने पुर्ण करावी, अशी मागणी करतांनाच त्यांनी शायराना अंदाजातून देखील टोपे यांना चिमटा काढला.  गोरंट्याल यांच्या या भाषणाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com