मराठा क्रांती भवनासाठी खारीचा वाटा उचलता आला, हे आमचे भाग्यच.. - It was our good fortune that was able to contribute for the Maratha Kranti Bhavan.jp75 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

मराठा क्रांती भवनासाठी खारीचा वाटा उचलता आला, हे आमचे भाग्यच..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 2 ऑगस्ट 2021

या भवनामध्ये  ई लायब्ररीपासून वस्तीगृह व अन्य आवश्यक सुविधा देखील असतील. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटावेत हीच आमची भावना आहे.

बीड : मराठा समाज नेहमीच मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिला आहे. या समाजाच्या ऋणातून उतराई होणे शक्य नाही. मात्र खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न आहे. बीडमध्ये उभारण्यात येणारे मराठा क्रांती भवन पुढच्या पिढ्यांच्या स्वप्नाला आकार देणारे ठरेल, विद्येची आणि विज्ञानाची ज्योत तेवत ठेवण्याचे काम या वास्तूच्या माध्यमातून केले जाईल, (It was our good fortune that was able to contribute for the Maratha Kranti Bhavan. Said, Ex.Minister Jaydatta Kshirsagar,Beed) असा विश्वास माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

बीडमध्ये उभारण्यात येणाऱ्या मराठा क्रांती भवनासाठी बीड नगर पालिकेने अत्यंत मोक्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध करू दिली. नुकतेय या जागेचे हस्तांतरण करण्यात आले.  सत्ता हे अंतिम ध्येय नाही तर साधन आहे, या माध्यमातून परिवर्तन घडवले तरच सत्तेचा समाजाला उपयोग होतो. (Maratha Kranti Bhavan In Beed) बीडमध्ये मराठा समाजाच्या होतकरू मुलांसाठी त्यांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी मराठा क्रांती भवन उभारले जात असून या चांगल्या कामासाठी  खारीचा वाटा उचलायला मिळणे हे आमचे भाग्य आहे.

या भवनामध्ये  ई लायब्ररीपासून वस्तीगृह व अन्य आवश्यक सुविधा देखील असतील. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटावेत हीच आमची भावना आहे. संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकारामांपर्यंत आपल्याला संस्काराची शिदोरी मिळालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींच्या लोकांना सोबत घेवून स्थापन केलेल्या स्वराज्याने महाराष्ट्रच काय देशाचा भूगोल बदलला. एकमेकांसाठी मदतीचा हात देणे हाच आमचा धर्म आहे.

मराठा समाजाच्या या भवनासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून मोठी वास्तू उभी केली जाईल, असेही जयदत्त क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले.  तत्पूर्वी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, परळीचे माजी नगराध्यक्ष देशमुख, सुभाष सपकाळ आदींनी आपली मतं मांडली.  शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, डॉ. अनिल बारकुल, नगरसेवक योगेश क्षीरसागर, किशोर पिंगळे, डॉ. राजेश भुसारी, गोरख शिंदे, हेमंत औटी, अनिल घुमरे, सत्येंद्र पाटील, राजू पिंगळे, गणेश खरात, नितीन सपकाळ यावेळी उपस्थित होते.

हे ही वाचा ः व्रतस्थ राजकारणी, चारित्र्यवान व्यक्ती, आलुरे गुरूजी यांचे निधन..

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख