आम्हाला इथवर यायला बेचाळीस वर्ष लागली, कराड तुम्हाला सहा महिन्यात कसे जमले..

रावसाहबे दानवे यांनी देखील आपल्याला दिल्लीत येण्याची इच्छा नसतांना बळजबरी पाठवले गेल्याचे म्हटले.
Minister Raosaheb Danve, Dr.Bhagwat Karad News Aurangabad
Minister Raosaheb Danve, Dr.Bhagwat Karad News Aurangabad

औरंगाबाद ः राजकारणात कधी काय होईल हे काही सांगता येत नाही, मोठ्या पदावर पोहचायला अर्धे आयुष्य खर्ची घालावं लागतं तेव्हा कुठे हे दिवस पहायला मिळतात. पण काही लोक फार नशीबवान असतात, आमचे डाॅक्टर कराड साहेब. सहा महिन्यांपुर्वी ते खासदार होतील असे कुणालाही वाटले नव्हते. (It took us forty two years to come here, how did Karad meet you in six months. Said, Railway State Minister Raosaheb Danve) पण ते खासदार झाले, मला अनेकांनी फोन करून विचारले, असे कसे झाले, मी म्हणालो मला माहित नाही, पण झाले खरे.

आता सहा महिने होत नाही तर पुन्हा केंद्रांत मंत्री ते ही अर्थखात्याचे. आताही अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मी चाळीस वर्षापासून अधिक काळापासून राजकारणात आहे. केंद्रात तीनवेळा मंत्री झालो, पण मला इथंवर पोहचायला बरीच वर्ष वाट पहावी लागली. (Dr. Bhagwat Karad, Finance Minister, Dehli) कराड साहेब तुम्ही कमी काळात एवढे रन कसे काढले? असे म्हणत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रासाहेब दानवे यांनी अर्थ राज्यमंत्री डाॅ. कराड यांना चिमटा काढला.

नुकत्याच झालेल्या दिल्लीतील एका कार्यक्रमात नव्याने मंत्रीमंडळात समावेश झालेले, खाते बदल झालेल्या मंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. नितीन गडकरी, नारायण राणे, कपिल पाटील, डाॅ. भागवत कराड यांच्यासह अनेकांची यावेळी उपस्थिती होती. या कार्यक्रमात सर्वच नेत्यांची भाषणे खुमासदार झाली. पण बाजी मारली ती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी. हाऊमच म्हणून केवळ एवढ्या एका शब्दावर आपण जगातील बारा देश फिरून आलो असे अभिमानाने सांगणारे दानवे यांचे भाषण म्हणजे उपस्थितांसाठी पर्वणीच असते.

दिल्लीतील कार्यक्रमात बोलायला उठले तेव्हा त्यांनी सुरूवातीलाच आता आम्ही मंत्री झालो आहोत, जबाबदारीने बोलावे लागते, अशी सुरूवात केली खरी, पण त्यांची गाडी पुन्हा पहिल्याच मार्गावर आली. राजकारणात किती कष्ट उपसावे लागतात हे सांगत असतांना त्यांनी डाॅ. कराड यांचे उदारहण देत काहीजण नशीब घेऊन येतात असा उल्लेख केला तेव्हा उपस्थितांनी टाळ्या वाजवत त्याला दाद दिली.

दानवे म्हणाले, पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची दखल घेतली जातेच. मी जनसंघापासून काम करतो, गावचा सरपंच, पंचायत समिती सभापती, दोनवेळा आमदार आणि पाच वेळा खासदार म्हणून निवडून आलो. बेचाळीस वर्ष लागली मला दिल्लीत यायला. पण काही लोकांचे नशीब भलतेच जोरावर असते. आता आमच्या डाॅक्टरांचेच पहाना, सहा महिन्यातच ते दिल्लीत आले आणि थेट अर्थ खात्याचे मंत्री झाले.

ते खासदार झाले तेव्हा अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले, आता मंत्री झाले तेव्हा माझ्यासह इतरांनीही प्रश्न पडला? की हे कसे झाले. पण सहा महिन्यात त्यांनी एवढे रन काढले की त कोणालाच जमू शकत नाही, एवढे मात्र खरे. कराड गेल्या अनेक वर्षापासून भाजपमध्ये प्रामाणिकपणे काम करतायेत. आता त्यांना केंद्रात अर्थ खात्याची जबाबदारी मिळाली आहे. नारायण राणे, नितीन गडकरी हे देखील अनुभवी आणि महत्वाची जबाबदारी असलेले नेते आहेत, देशाच्या विकासात योगदान देतांनाच आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी देखील एकत्रितपणे काम करू, अशी ग्वाही देखील दानवे यांनी दिली.

मलाही दिल्लीत यायची इच्छा नव्हती..

केंद्रीय नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात आपल्या दिल्लीत येण्याची अजिबात इच्छा नव्हती असे सांगितले होते. तोच धागा पकडत रावसाहबे दानवे यांनी देखील आपल्याला दिल्लीत येण्याची इच्छा नसतांना बळजबरी पाठवले गेल्याचे म्हटले. दोनवेळा आमदार म्हणून निवडून आलो. माझं बरं चाललं होतं, एक दिवस अचानक प्रमोद महाजनांचा मला फोन आला आणि त्यांनी रावसाहेब तुम्हाला लोकसभा लढवायची असल्याचे सांगितले. मी म्हणालो, साहेब मी इथंच बरा आहे, मला दिल्लीला कशाला पाठवता, पण त्यांनी काही माझं ऐकल नाही.

लोकसभेची उमेदवारी दिली, मी जालन्यातून निवडूनही आलो. निवडून आल्यावर प्रमोदजी मला म्हणाले, अरे मला तुला खासदार करायचे नव्हते, तर अटलजींना पंतप्रधान करायचे होते, म्हणून तुला लोकसभा लढवायला सांगितली, असा किस्साही दानवे यांनी यावेळी सांगितला. नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळात अनेक नवे चेहरे आले, काहीजण गेले, तर काही मंत्रीपद वाचवण्यासाठी धडपडत होते, असे म्हणताच दानवेंचा स्वतःकडे असलेला रोख लक्षात येताच उपस्थितांनी त्यांना दाद दिली.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com