..या जिल्हाधिकाऱ्यांच्या काळात घोटाळ्याची चौकशी होईल असे वाटत नाही; त्यांची बदली करा

जिल्हाधिकारी जगताप यांच्या कार्यकाळात चौकशी होईल असे वाटत नाही, म्हणूनच त्यांची मुख्य सचिवांनी तातडीने बदली करावी.
Bombay High Court Bench Aurangabad News
Bombay High Court Bench Aurangabad News

औरंगाबाद ः बीड जिल्ह्यात नरेगामध्ये गैरप्रकार झाल्याच्या प्रकरणात खंडपीठाने चौकशीचे आदेश दिले होते. (It is not expected that the MGNREGA scam will be investigated during the tenure of these District Collectors; Replace them) मात्र, त्यानंतरही चौकशीत निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची बदली करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती एस. जी. मेहारे यांनी दिले आहेत.

बीड जिल्ह्यात वर्ष २०११ ते २०१९ या कालावधीत नरेगामध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याप्रकरणी राजकुमार देशमुख यांनी याचिका दाखल केली होती. (Bombay High Court Bench Aurangabad) या प्रकरणात २१ जानेवारी २०२१ रोजी खंडपीठाने सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. (Ravindra Jagtap Beed Collector) मात्र प्रत्यक्षात कारवाई झाली नाही.

त्यानंतर २५ जूनरोजी जिल्हाधिकाऱ्यांनी शपथपत्र दाखल करून चौकशी समिती नेमल्याचे न्यायालयात सांगितले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या सुनावणीत जिल्हाधिकारी यांनी दाखल केलेल्या शपथपत्रानंतर खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकारी जगताप यांच्या कार्यकाळात चौकशी होईल असे वाटत नाही, म्हणूनच त्यांची मुख्य सचिवांनी तातडीने बदली करावी, असे आदेश दिले.

या प्रकरणाच्या अनुषंगाने नवीन जिल्हाधिकाऱ्यांना नवीन सूचना देण्यात येतील असेही खंडपीठाने स्पष्ट केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे गिरीश थिगळे (नाईक) यांनी काम पाहिले.  

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in