विदेशातून लस मिळणे अशक्य, राज्याची मदार कोव्हॅक्सीन, कोव्हिशिल्डवरच..

तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर अधिक परिणाम होणार आहे अशी माहिती राज्याला देण्यात आली आहे.
Health Minister Rajesh Tope News jalna
Health Minister Rajesh Tope News jalna

जालना ः राज्यातील लसीकरणाला वेग मिळावा, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व वयोगटातील नागरिकांना लस मिळावी, असे सरकारचे प्रयत्न होते. त्यासाठी जागतिक निविदा देखील काढण्यात आल्या. मात्र त्यामध्ये अनेक अडचणी आहेत, त्यामुळे विदेशातून लस मिळणे शक्य नाही. (It is impossible to get vaccine from abroad, the state's depend is Covacin, only on Covishield, said Health Minister Rajesh Tope) सध्या तरी राज्याची मदार ही कोविशिल्ड व कोव्हॅक्सीनवरच असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

लाॅकडाऊ व राज्यातील कोरोना परिस्थिती संदर्भात टोपे जालन्यात प्रसार माध्यमांशी बोलत होते, तिसऱ्या लाट थोपवण्यासाठीची तयारी, व्हॅक्सीन, रेमडेसिव्हिरची उपलब्धता व लाॅकडाऊन संदर्भातील नियम यावर त्यांनी सविस्तर माहिती दिली.

टोपे म्हणाले, राज्यातील ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांचं प्रमाण अधिक आहे, त्या ठिकाणी आहे ते निर्बध कायम ठेवण्यात येणार आहेत. गरज पडल्यास आणखी निर्बध कडक करण्यात येतील. (In places where the incidence of infection is low, the Chief Minister has given the authority to the district administration to relax.) मात्र, ज्या ठिकाणी संसर्गाचं प्रमाण कमी आहे, तिथे निर्बध शिथिल करण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता राज्य पातळीवर सर्व प्रकारची खबरदारी घेतली जात आहे. ही लाट थोपवण्यासाठी टास्क फोर्स तयार करण्यात आला असून त्यानूसार सर्वप्रकारची पुर्व तयारी सुरू आहे. (The third wave is going to have a greater impact on young children) तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर अधिक परिणाम होणार आहे अशी माहिती राज्याला देण्यात आली आहे.

या लाटेला थोपवण्यासाठी राज्य सरकार तयारीला लागलंय. प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पेडीयोट्रिक आयसीयू तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लहान मुलांसाठी आवश्यक संसाधनांची जमवाजमव करण्यात येत असल्याचेही टोपे यांनी सांगितले.  

एकाच दरात लस मिळावी..

राज्यातील लसीकरणा संदर्भात सांगताना टोपे यांनी ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून विदेशातून लस मिळणं शक्य नसल्याचेही स्पष्ट केले. केंद्र आणि राज्य सरकारला एकाच दरात लसींचा पुरवठा व्हावा यासाठी न्यायालयात एक याचिका दाखल झाली असून एकाच दरात सर्व राज्यांसह केंद्राला लस पुरवठा होणं अपेक्षित असल्याचे टोपे म्हणाले.

कंपन्यांकडून किती लस पुरवठा राज्याला होईल याची माहिती मिळणं आवश्यक असून  सध्या ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून विदेशातून लस मिळणं शक्य नाही. त्यामुळे सध्या राज्याची मदार कोविशील्ड आणि कोव्हॅकसीनवरच असल्याचं टोपे यांनी स्पष्ट केलं. राज्यात रेमडेसिवीर मुबलक प्रमाणात असून कोणतीही कमतरता नसल्याचं ते म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com