अभियंत्यांच्या नाकर्तेपणामुळे मराठवाड्यात सिंचन नाही; पाणी हक्क परिषेदत वाचा फोडणार..

मराठवाडा पाणी हक्क परिषदेचे उदघाटन महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते होणार आहे.
Marathwada Water Conference News Aurangabad
Marathwada Water Conference News Aurangabad

औरंगाबाद : मराठवाड्याच्या सिंचनाच्या व पिण्याच्या पाणीप्रश्‍नाबाबत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पुर्वसंध्येला मराठवाडा पाणी हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाडा बहुजन विकास आघाडीच्यावतीने गुरूवारी (ता.१६ ) दुपारी एक वाजता ही परिषद होणार आहे. (Irrigation in Marathwada due to faulty canals and negligence of engineers.) मराठवाडा बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

मराठवाड्यात ६४ लाख हेक्टर जमीनीचे क्षेत्रफळ असून सिंचन १६ लाख हेक्टरचेच सिंचन होऊ शकते. यामध्ये केवळ ३ लाख एकर जमीनच भिजते. (Marathwada Pani Haak Parishad Held On 16 the Sept.) नादुरूस्त कालवे व अभियंत्यांच्या नाकर्तेपणामुळे मराठवाड्यात सिंचन होत नाही, मराठवाडा त्यामुळेच सिंचनात मागास आहे. (Z.P. Member Ramesh Gaikwad, Aurangabad) औरंगाबादसारख्या मराठवाड्यातील महानगरासह संपुर्ण मराठवाड्याचा पाणीप्रश्‍न गंभीर होत असल्याचे गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

मराठवाडा पाणी हक्क परिषदेचे उदघाटन महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते होणार आहे.  तर आमदार अतुल सावे, बाबजानी दुर्राणी, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके, जिल्हा परिषदेचे बांधकाम समिती सभापती किशोर बलांडे, शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश गलांडे यांची या परिषदेला उपस्थिती राहणार आहेत.  

मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मंजुर न करता पश्‍चिम वाहिन्यांचे व उजनीचे पाणी देणार असे गाजर दाखवले जात आहे. धरणे पुर्ण भरली तरी अभियंत्यांच्या मनमानीमुळे मराठवाड्याचे सिंचन होत नाही. मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांच्या सुधारीत मान्यता व अंदाजपत्रकात मनमानी किंमती फुगवल्या असून त्यासाठी न्यायालयीन समिती नेमुन चौकशी करावी अशी मागणीही गायकवाड यांनी यावेळी केली.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com