कराड, दानवे यांच्या मंत्रीपदावर चर्चा करण्यापेक्षा त्याकडे सकारात्मकतेने बघावे..

कराड यांना मिळालेली संधी ही त्यांचे पक्षकार्य, उच्चशिक्षण आणि प्रश्नांची जान असल्याच्या निकषावर झाली आहे.
Bjp Leader vijaya rahatkar news Aurangabad
Bjp Leader vijaya rahatkar news Aurangabad

औरंगाबाद ः डाॅ. भागवत कराड यांना मंत्रीपद कसे मिळाले, रावसाहेब दानवे यांचा राजीनामा मागितला होता का? या चर्चांना काहीही अर्थ नाही, त्यावर चर्चा करण्यापेक्षा मराठवाड्याला कधी नव्हे ते एवढी महत्वाची खाती मिळाली आहेत. (Instead of discussing Karad, Danve's ministerial post, he should look at it positively.) त्याचा मराठवाड्याच्या विकासाला आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी किती लाभ होईल हे लक्षात घेतले पाहिते. या दोन्ही मंत्र्यांच्या खात्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे, असे मत भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांनी व्यक्त केले आहे.

खासदार डाॅ. भागवत कराड यांनी नुकताच केंद्रात अर्थ खात्याचे राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला, तर रावसाहेब दानवे यांच्याकडे रेल्वे, कोळसा आणि खाण मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (Bjp National Secretery Vijay Rahatkar)आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात औरंगाबाद आणि जालना या दोन मराठवाड्यातील जिल्ह्यांना एवढी मोठी संधी  केंद्रात कधीच मिळाली नव्हती, ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे, असेही रहाटकर म्हणाल्या.

केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार झाला तेव्हापासून राज्यात विशेषतः मराठवाड्यात विविध चर्चांना उधाण आले आहे. (Bjp Central State Minister Raosaheb Danve) डाॅ. भागवत कराड यांना वर्षभरातच खासदारकी आणि लगेच केंद्रात महत्वाच्या खात्याचे मंत्री म्हणून जबाबदारी, पंकजा, खासदार प्रितम मुंडे यांना डावलण्याचा हा प्रकार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ((Bjp Central State Minister Dr.Bhagwat Karad) तर दुसरीकडे रावसाहेब दानवे यांचे मंत्रीपद कसे वाचले? यावर देखील अनेक तर्क राजकीय वर्तुळात आणि प्रसार माध्यमांमध्ये देखील लढवले जात आहे.

या संदर्भात सरकारनामा प्रतिनिधीने विजया रहाटकर यांच्यांशी संपर्क साधला. रहाटकर म्हणाल्या, खरंतर मराठवाड्याला दोन महत्वाची मंत्रीपद मिळाली आहेत, याच सगळ्यांनी स्वागत करायला हवे. पण त्यावरून राजकारण केले जात आहे हे दुर्दैवीच म्हणावे लागेल. आतापर्यंतच्या केंद्रातील कुठल्याच सरकारने मराठवाड्याला एवढी मोठी संधी कधीच दिली नव्हती, ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. देशात व महाराष्ट्रात भाजपने संघटना वाढवण्यावर जोर दिला आहे. त्यादृष्टीने देखील केंद्रीय मंत्रीमंडळात नव्याने कराड यांचा झालेला समावेश आणि रावसाहेब दानवे यांच्या खात्यात झालेला बदल महत्वाचा आहे.

कराड यांना मिळालेली संधी ही त्यांचे पक्षकार्य, उच्चशिक्षण आणि प्रश्नांची जान असल्याच्या निकषावर झाली आहे. मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम, मांडलेले प्रश्न हा अनुभव त्यांना आता त्यांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री म्हणून मराठवाडा आणि जिल्ह्याचे सर्वकष प्रश्न सोडवतांना निश्चितच होणार आहे. कराडांना अर्थ खाते मिळाल्यामुळे मराठावाडा किंवा जिल्ह्यातील कुठल्याच योजना किंवा प्रकल्पासाठी निधी कमी पडणार नाही, मराठवाड्याला आपले झुकते माप असेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.  त्यामुळे मिडियाने देखील त्यांच्या निवडीकडे राजकारण म्हणून न पाहता सकारात्मकरित्या पहावे, असेही रहाटकर म्हणाल्या.

दानवेंचा राजीनामा ही निव्वळ अफवा..

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा राजीनामा मागितला किंवा त्यांनी तो दिला या ज्या बातम्या मंत्रीमंडळ विस्तार काळात मिडियामध्ये दाखवल्या गेल्या, त्यात काही तथ्य नव्हते. रावसाहेब दानवे यांचा राजीनामा मागितलाच नव्हता, उलट त्यांचा अनुभव आणि अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम पाहता पंतप्रधान मोदींनी त्यांना बढती दिली असेच म्हणावे लागेल. रेल्वे, कोळसा आणि खाण हे मंत्रालय मोठे आणि अत्यंत महत्वाचे आहे.

आतापर्यंत मराठवाड्यातील रेल्वेप्रश्नासाठी लोकप्रतिनिधींना रेल्वेमंत्र्यांची भेट मिळत नव्हती, आता तर आपल्याच भागातील दानवे हे त्या खात्याचे मंत्री झाले आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे, अनेकवर्षांपासून प्रलंबित असलेले रेल्वेचे प्रश्न आता मार्गी लागतील यात शंका नाही. तेव्हा मराठवाड्याला मिळालेली ही सुवर्ण संधी आहे, तिचा हे दोन्ही नेते आपल्या भागासाठी निश्चितच उपयोग करून घेतली यात शंका नाही, असा विश्वास देखील विजया रहाटकर यांनी व्यक्त केला.

Edited By : Jagdish Pansare


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com