आमदार मेटेंच्या पुढाकारातून बीडजवळ दोनशे खाटांचे कोविड सेंटर लवकरच..

अशा संकट काळात समाजासाठी काही केले नाही तर लोकप्रतिनिधी म्हणून राहण्याचा अधिकार काय.
Mla Vinayak Mete News Beed
Mla Vinayak Mete News Beed

बीड : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा वेग वाढतच असल्याने सक्रीय रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. तालुक्यातील सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची सोय व्हावी, यासाठी शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी स्वखर्चातून २०० खाटांच्या कोविड केअर सेंटरची उभारणी सुरु केली आहे. त्याचे काम पूर्णत्वाकडे आले असून पुढील आठवड्यात ते सुरू होईल.

शहरानजीकच्या खापर पांगरी रोडवरील जिजाऊ मांसाहेब पब्लिक स्कुलच्या इमारतीमध्ये सदर कोविड केअर सेंटर उभारले जात आहे. जिल्ह्यात मार्च महिन्यापासून सुरु झालेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रोज हजारांच्या पुढे रुग्ण आढळत आहेत. दवाखाने रुग्णांनी खचाखच भरले आहेत, तर कोविड केअर सेंटरमध्येही जागा अपूऱ्या पडत आहेत.

बीड तालुक्यात रोजच तीनशेंच्या घरात रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या यंत्रणेवर ताण येत असून शहरातील इतर शासकीय कोविड केअर सेंटर मध्ये देखील आता बेड मिळेनासे झाले आहे. त्यामुळे रुग्णांची सोय व्हावी यासाठी आमदार विनायक मेटे यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चातून दोनशे खाटांचे कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला.

कोविड केअर सेंटर उभारणीचे कामही पूर्णत्वाकडे आले असून पुढच्या आठवड्यात केंद्र कार्यान्वित होणार आहे. रुग्णांना चहा, नाष्टा, काढा, जेवणासह शासनाने सांगीतल्याप्रमाणे सर्व पौष्टीक आहार दिला जाणार आहे, तसेच  स्वच्छतेची संपूर्ण काळजी देखील येथे घेतली जणार असल्याचे विनायक मेटे यांनी सांगितले.

यांचेही योगदान..

मेटे यांच्या विधायक उपक्रमात जिजाऊ मासाहेब ग्रुपचे बबनराव शिंदे यांनीही योगदान दिले. त्यांनी त्यांच्या पांगरी रोडवरील जिजाऊ मासाहेब पब्लिक स्कुलची इमारत व इतर सुविधा उपलब्ध करुन दिल्या. प्रशस्त असलेली इमारत निसर्गसानिध्यात असल्याने रुग्णांनाही या ठिकाणी प्रसन्न वातावरणात राहता येणार आहे.

अशा संकट काळात समाजासाठी काही केले नाही तर लोकप्रतिनिधी म्हणून राहण्याचा अधिकार काय. गरज पडली तर आणखी खाटांची क्षमता वाढविण्यात येईल. सर्व सुविधा व जेवण उत्तम दर्जाचे असेल, असा विश्वास देखील मेटे यांनी या निमित्ताने दिला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com