परभणी मेडिकल काॅलेजच्या फाईलवर उद्योगमंत्री सही करेना; राष्ट्रवादीचा आरोप

महाविद्यालयासाठी लागणाऱ्या जमीन हस्तांतरणावर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अद्यापही स्वाक्षरी केलेली नाही. त्यामुळे ही प्रक्रिया रख़डली आहे.
Ncp Mp Fauzia Khan- Minister Subhash Desai News Parbhani
Ncp Mp Fauzia Khan- Minister Subhash Desai News Parbhani

परभणी :परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीची प्रक्रिया आता अंतिम टप्पात आली आहे. परंतू जमीन हस्तांतरणाची फाईल उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या स्वाक्षरीमुळे अडकली आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉग्रेसच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार फौजिया खान यांनी बुधवारी (ता.एक) केला. (Industry Minister does not sign the file of Parbhani Medical College; Allegations of NCP) आता  या स्वाक्षरीसाठी जनआंदोलनाच्या माध्यमातून रेटा लावावा लागणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुर व्हावे यासाठी सर्वस्तरावर आंदोलने सुरु आहेत. (Shivsena Industrial Minister Subhash Desai Maharashtra) एकीकडे खासदार फौजिया खान व माजी आमदार अॅड.विजयराव गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली परभणीकर संघर्ष समिती प्रयत्न करत आहे.

तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आंदोलन छेडण्यात आले आहे. (Ncp Mp Fuziya Khan Parbhani) या आंदोलनाला आता जनआंदोलनाचे स्वरुप आले असून आज परभणीत युवकांनी धरणे आंदोलन केले.

या संदर्भात राष्ट्रवादी कॉग्रेसच्या खासदार फौजिया खान यांनी बुधवारी एका व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिक्रिया नोंदविली आहे.  परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून परभणीकर संघर्ष करित आहेत. आतापर्यंत भौतिक सुविधा, प्रस्ताव पाठविण्याची कामे करण्यात आली आहेत. तेव्हापासून हे आंदोलन सुरु झाले होते.

परंतू आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. आता शेवटचा रेटा द्यावा लागणार आहे. कॅबिनेटमध्ये सुध्दा फाईल बुक करण्यात आली आहे. ती अर्थ मंत्रालयात गेली आहे, परंतू महाविद्यालयासाठी लागणाऱ्या जमीन हस्तांतरणावर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अद्यापही स्वाक्षरी केलेली नाही. त्यामुळे ही प्रक्रिया रख़डली आहे.

उद्योगमंत्र्यांच्या स्वाक्षरीसाठी आता परभणीतील नेत्यांना लक्ष देवून ते काम प्राधान्यक्रमाने करावे लागणार आहे, असेही खासदार फौजिया खान म्हणाल्या.
आता परभणीकरांचे हे जनआंदोलन झाले आहे. हा लढा शेवटचा म्हणून लढावा लागणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com