महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या, कायदा व सुव्यवस्था सक्षम करा..

`पोलीस मित्र' ही संकल्पना राबविली तर नागरीकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होईल.
महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या, कायदा व सुव्यवस्था सक्षम करा..
Mp Pritam Munde- Sp A Raja News Beed

बीड ः मागील काही दिवसापासून जिल्ह्यात महिला व अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा आरोप करत खासदार प्रीतम मुंडे यांनी पोलिस अधिक्षकांना कायदा,सुव्यवस्था सक्षम करण्याचा सूचना दिल्या. (Increase the incidence of violence against women, enable law and order.)

मुंडे यांनी आज पोलीस अधिक्षक ए. राजा यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, महिलांवरील अत्याचाराच्या घटना या विषयावर चर्चा झाली. (Bjp Mp Dr. Pritam Munde, Beed) यावेळी प्रीतम मुंडे यांनी पोलिस अधिक्षकांना अनेक सूचना देखील केल्या.

पोलिस अधिक्षक ए.राजा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यात वाळू माफियांच्या विरोधात कठोर पावले उचलली होती. (Supritendent Of Police A. Raja Beed) जिल्हाधिकाऱ्यांसह त्यांनी थेट गोदापात्रात जाऊन अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई केली होती. त्यांच्या या कामगिरीचे जिल्हाभरात कौतुक देखील झाले.

मात्र महिलांवरील वाढते अत्याचार, जिल्ह्यात बळावलेली गुंड प्रवृत्ती याला रोखण्यासाठी कठोर उपाय योजना करण्याच्या सूचना प्रीतम मुंडे यांनी आजच्या भेटीत दिल्याने यातून त्यांनी पालकमंत्र्यांवर देखील अप्रत्यक्षरित्या निशाणा साधल्याची चर्चा आहे.  

काही दिवसांपासून जिल्ह्यात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.,या अनुषंगाने आज जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेतल्याचे प्रीतम मुंडे यांनी सोशल मिडियाच्या माध्मातून सांगितले. या भेटी संदर्भात अधिक माहिती देतांना मुंडे म्हणाल्या, बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी त्यांना सूचना केल्या आहेत. 

प्रत्येक गावात पोलिसांचा सहकारी म्हणून पोलीस मित्राची नियुक्ती करून `पोलीस मित्र' ही संकल्पना राबविली तर नागरीकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होईल. गुन्हेगारी प्रवृत्तींना पायबंद घालण्यासाठी पोलीस पेट्रोलिंग वाढवण्यात यावी, जेणेकरून गुन्हेगारी घटनांना आळा बसेल,अशा सूचना पोलीस अधीक्षकांना दिल्या. 

यावेळी पोलीस अधीक्षक ए. राजा यांनी `पिंक मोबाईल` पथक' या उपक्रमाविषयी माहिती दिली. महिलांच्या तक्रारी आणि सुरक्षेसाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे ते म्हणाले. पिंक मोबाईल पथकची व्याप्ती वाढविण्यासह त्याची उपयोगिता अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा पोलीस दलामार्फत प्रसार आणि प्रचार करण्याच्या सूचना ही त्यांना दिल्या.

पोलीस अधीक्षकांनी माझ्या सूचनांना सकारात्मक प्रतिसाद देऊन पुढील काळात पोलीस मित्र ही संकल्पना राबविण्याचा मनोदय व्यक्त केल्याचेही प्रीतम मुंडे यांनी सांगितले. 

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in