अभ्यासक्रमात कृषीच्या समावेशाने शेतीप्रती कृतज्ञतेची भावना वाढेल..

कृषी क्षेत्राशी निगडीत संदर्भ त्यांना शिकवण्यामुळे शास्त्रीय दृष्टीकोन निर्माण होवून पीक उत्पादन पध्दतीत त्याचा उपयोग होवू शकतो.
Shivsena Mla Rahul Patil Parbhani News
Shivsena Mla Rahul Patil Parbhani News

परभणी ः शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्यात येणार आहे. यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद यांच्यावर अभ्यासक्रम तयार करण्याची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती आमदार डॉ. राहूल पाटील यांनी दिली. (Inclusion of agriculture in the curriculum will increase the feeling of gratitude towards agriculture.) शिक्षणमंत्री  वर्षा गायकवाड आणि कृषीमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

ज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, शालेय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्यासह वरीष्ठ अधिकारी यावेळी  उपस्थित होते. (Shivsena Mla Rahul Patil Parbhani) शालेय व माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रमात कृषी विषय अनिवार्य करण्यात यावा, अशी मागणी करत आपण देखील वारंवार पाठपुरावा केला होता, असेही पाटील यांनी सांगितले.

भारत हा कृषी प्रधान देश असून देखील शालेय व माध्यमिक शिक्षणामध्ये कृषी विषय नाही याची खंत युनिर्व्हसिटी ग्रँट कमिशन २०१७ च्या अहवालात व्यक्त करण्यात आली होती.  या अहवालानुसार उच्च माध्यमिक शिक्षण स्तरावर  १ कोटीपेक्षा जास्त म्हणजे ३६ टक्के मुले कला शाखेत, त्या पाठोपाठ विज्ञान शाखेत १९ टक्के तर वाणिज्य शाखेत १६ टक्के विद्यार्थी शिक्षण घेतात. कृषी क्क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या मुलांचे प्रमाण केवळ ०.१३ टक्के आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे हे प्रमाण ३ टक्क्यांपर्यंत वाढण्यास मदत होणार आहे. शालेय स्तरापासून कृषी विषयाचा समावेश केल्याने विद्यार्थ्यांमध्ये शेतकरी आणि शेतीप्रती कृतज्ञतेची भावना वाढेल.

कृषी क्षेत्राशी निगडीत संदर्भ त्यांना शिकवण्यामुळे शास्त्रीय दृष्टीकोन निर्माण होवून पीक उत्पादन पध्दतीत त्याचा उपयोग होवू शकतो. नवी पिढी शास्त्रीय पध्दतीने शेती व्यवसाय करू शकेल. पर्यायाने राज्य व देशाच्या सकल उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल, असा विश्वास देखील पाटील यांनी व्यक्त केला.

Edited  By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com