पालकमंत्र्यांच्या पत्रात इम्तियाज जलील यांचे नावही नाही, मग त्यांनी अंगावार का ओढावून घेतले? 

पालकमंत्री म्हणून त्यांनी कोरोना काळात जनतेची खूप काळजी वाहिली. मेलट्राॅन साऱखे कोविड तीनशे बेडचे हाॅस्पीटल उभारून त्याद्वारे हजारो रुग्णांवर मोफत उपचार केले.
mla ambadas danve react Mp Imtiaz jalil letter news Aurangabad
mla ambadas danve react Mp Imtiaz jalil letter news Aurangabad

औरंगाबाद ः सुभाष देसाई यांनी लोकप्रतिनिधींना उद्देशून लिहलेल्या पत्रात त्यांनी कुणाच्याही नावाचा उल्लेख केला नाही. खासदार इम्तियाज जलील यांचा तर नाहीच नाही, मग त्यांनी अंगावर ओढवून का घेतले? (Imtiaz Jalil's name is not even mentioned in the letter of the Guardian Minister, said mla ambadas danve) असा सवाल करत शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी इम्तियाज जलील यांच्या खुल्या पत्रावर आपली भूमिका स्पष्ट केली.

नियम मोडून निर्बंध असतांना दुकाने सुरू ठेवल्या प्रकरणी प्रशासनाने ३६ दुकांनाना सील केले होते. या व्यापारी व दुकानदारांची दुकाने उघडून त्यांचा दंड कमी करावा, यासाठी खासदार इम्तियाज जलील यांनी दोन दिवसांपुर्वी कामगार उपायुक्त कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. (Imtiaz Jalil had gone to the office of the Deputy Commissioner of Labor two days ago and arrested the officers.) गर्दी जमवून धमकावत असल्याचे चित्रीकरण करणाऱ्या एका महिला पोलिस कर्मचाऱ्याबद्दल देखील त्यांनी अपशब्द वापरले होते.

या सगळ्या प्रकारावर पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली होती. तसेच लोकप्रतिनिधींचे वागणे अशोभनिय असल्याचे म्हटले होते.  हे पत्र खासदार इम्तियाज जलील यांच्या चांगलेच जिव्हारी लागले होते. (MLA Ambadas Danve criticized Imtiaz Jalil's letter) त्यानंतर त्यांनी तीन पानी खुले पत्र लिहित सुभाष देसाई यांना काही प्रश्न विचारले होते. आता इम्तियाज जलील यांच्या पत्रावर आमदार अंबादास दानवे यांनी व्यक्त होत टीका केली आहे.

पालकमंत्र्यांनी लिहलेल्या पत्रात कुठेही इम्तियाज जलील यांच्या नावाचा उल्लेख केला नाही, तरी देखील त्यांना हे पत्र इतके का बोचले? असा टोलाही लगावला. अंबादास दानवे म्हणाले, सुभाष देसाई हे राज्याचे शिवसेनेचे ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत. पालकमंत्री म्हणून त्यांनी कोरोना काळात जनतेची खूप काळजी वाहिली. (Subhash Desai is a senior and experienced Shiv Sena leader of the state.) मेलट्राॅन साऱखे कोविड तीनशे बेडचे हाॅस्पीटल उभारून त्याद्वारे हजारो रुग्णांवर मोफत उपचार केले.

प्रशासनामुळेच कोरोना आटोक्यात..

आजही जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटण्यामध्ये जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त,महापालिका आयुक्त, पोलिस अधिक्षक, विभागीय आयुक्त यांच्यासह पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाचा व जनतेच्या सहकार्याचा मोठा वाटा आहे. पालकमंत्र्यांनी लिहलेले पत्र हे एका वेगळ्या भावनेतून आणि लोकप्रतिनिधींना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने लिहले होते.

कोरोना काळातील निर्बंध अडीच लाखाहून अधिक व्यापरी, दुकानदारांनी पाळले, ज्या ३६ जणांची बाजू घेऊन खासदार रस्त्यावर उतरले होते, त्यांनी नियम पायदळी तुडवले म्हणून प्रशासनाने त्यांच्यावर सील लावण्याची व दंडात्मक कारवाई केली होती. मग खासदार इम्तियाज जलील यांनी नियम पाळणाऱ्या अडीच लाख व्यापाऱ्यांच्या बाजूने उभे राहायला हवे की, ज्या ३६ जणांनी नियम पायदळी तुडवले त्यांच्या हे त्यांनीच ठरवावे. कोरोनाचा काळ हा संघर्ष करण्याचा नाही, तर एकमेकांशी समन्वय राखून काम करण्याचा असल्याचेही दानवे म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com