इम्तियाज जलील यांनी आगाऊपणा करू नये; खैरेंचा इशारा..

चूकन निवडून आलेल्या खासदारांना लोकसभा समजायलाच पाच वर्ष लागतील, तेव्हा त्यांनी उगाच विकासकामांचा आव आणू नये.
इम्तियाज जलील यांनी आगाऊपणा करू नये; खैरेंचा इशारा..
chandrakant khaire -Imtiaz Jalil news aurangabad

औरंगाबाद ः मुख्यमंत्र्यांचे उपरोधिक स्वागत करण्याची स्टटंबाजी व आगाऊपणा एमआयएम आणि इम्तियाज जलील यांनी करू नये. शिवसेनेने किंवा आमच्या महापौरांनी शहरात काय विकास कामे केली, हे इथल्या जनतेला माहित आहे. (Imtiaz Jalil should not take the lead; khaire Warn Aimim) आम्हाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नाटकबाजी आणि गोंधळ घालण्याचा प्रयत्न एमआयएमने करू नये, असा टोला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी खासदार इम्तियाज जलील यांना लगावला.

इम्तियाज जलील यांनी काल पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या २५ वर्षाच्या शहरातील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. (Shivsena Leader Chandrakant Khaire, Aurangabad) शिवसेनेने काढलेल्या शहराच्या विकासकामांच्या पुस्तिकेची खिल्ली उडवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उपरोधिक स्वागत करण्याची घोषणा केली. यावरून आता शिवसेना विरुद्ध एमआयएम असे चित्र निर्माण झाले आहे. (Aimim Mp Imtiaz Jalil, Aurangabad) शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मात्र इम्तियाज जलील यांचा हा प्रकार म्हणजे स्टंटबाजी असल्याची टीका केली आहे.

खैरे म्हणाले, औरंगाबाद हा शिवसेनाचा गड आहे, यापुढेही तो असाच कायम राहील. लोकसभा निवडणुकीत जी चूक झाली, ती भविष्यात पुन्हा होणार नाही. इम्तियाज जलील यांना निवडून दिल्याबद्दल आता अनेक मुस्लीम लोकच तक्रार करायला लागले आहेत. विशिष्ट भागात काम करून मी शहराचा विकास करतो, असा ढोल फक्त त्यांच्याकडून बडवला जातो. लोक आजही या जिल्ह्याचा खासदार मलाच मानतात. अनेक मुस्लिम लोक माझ्याकडे कामे घेऊन येतात आणि ती मी करतो देखील.

त्यामुळे इम्तियाज जलील यांच्या अशा नाटकांना येथील जनता भूलणार नाही. शिवसेनेने १४ महापौर दिले, त्यांच्या माध्यमातून शहारात विकासकामे देखील केली, पण काहींना ती दिसत नाही. वीस वर्ष या जिल्ह्याचा खासदार म्हणून मी देखील अनेक विकासाचे प्रकल्प, योजना आणल्या. तेव्हा मी केलेल्या विकासकामांबद्दल इम्तियाज जलील यांनी आभार मानण्याचे कारण नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ते माहित आहे.

गडबड कराल, तर खबरदार..

चूकन निवडून आलेल्या खासदारांना लोकसभा समजायलाच पाच वर्ष लागतील, तेव्हा त्यांनी उगाच विकासकामांचा आव आणू नये. राहिला प्रश्न मुख्यमंत्र्यांचे  उपरोधिक स्वागत करण्याचा तर पोलिसांनी कुठल्याही प्रकारच्या आंदोलन, गर्दी करण्यावर बंदी घातलेली आहे.

कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठी पोलिसा आयुक्त सक्षम आहेत. इम्तियाज जलील यांनी आगाऊपणा केला तर पोलिस त्यांना उचलून नेतील. काही गडबड करण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना खंबीर आहे, हे देखील त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा देखील खैरे यांनी एमआयएमला दिला.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in