इम्तियाज जलील हे आमचेच पाप, योग्यवेळी त्यांना घरीही पाठवू..

आम्ही सत्तेत आहोत, सत्ताधारी पक्षाला संयम बाळागावा लागतो. नाहीतर आम्ही त्यांना जशास तसे उत्तर देऊ शकतो.
State minister abdul sattar -Imtiaz Jalil news Aurangabad
State minister abdul sattar -Imtiaz Jalil news Aurangabad

औरंगाबाद ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या औरंगाबादेत येऊन दिमाखात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी ध्वजारोहण करणार आहेत. या शिवाय अनेक विकासकामांचे उद्धाटन, भुमीपूजन आणि नव्या योजनाचांच्या घोषणा करतील. (Imtiaz Jalil is our sin, we will send him home at the right time.) उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे सुपूत्र आहेत, ते एमआयएम, मनसेच्या पोकळ धमक्यांना घाबरणार नाहीत. आम्ही सत्तेत आहोत, म्हणून संयम बाळगतो, त्यामुळे मराठवाड्याच्या विकासाआड कोणी येऊ नये, असा इशारा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिला.

एमआयएमचे इम्तियाज जलील यांना निवडून आणण्यात तेव्हा माझाही हात होता, ते आमचेच पाप आहे. पण योग्यवेळी आम्ही त्यांना घरीही पाठवू, असेही सत्तार म्हणाले. (State Minister Abdul Sattar) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने उपरोधिक स्वागत, आंदोलन व ताफा अडवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या संदर्भात प्रसार माध्यमांशी बोलतांना सत्तार यांनी या पक्षांना सयंम बाळगण्याचे आवाहन केले.  सत्तार म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा व राज्याची विकासाकडे वाटचाल सुरू आहे. (Aimim Mp Imtiaz Jalil, Aurangabad) असे असतांना कुणी त्यात आडकाठी आणण्याचा प्रयत्न करू नये. ज्या पक्षांनी आंदोलन करण्याच्या पोकळ धमक्या दिल्या आहेत, त्यांनी संयम बाळगावा. राहिला प्रश्न मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाचा तर त्या संदर्भात जो निकाल देण्यात आला आहे, तो सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे.

राम मंदिरा संदर्भातील निर्णय जसा मुस्लीम समाजाने स्वीकारला, त्याच प्रमाणे आरक्षणाच्या बाबतीत देखील आपल्याला भूमिका घ्यावी लागेल. एमआयएमने मुख्यमंत्र्यांचे तुतारी वाजवून, फुलांचा वर्षाव करत उपरोधिक स्वागत करण्याचा इशारा दिला आहे, याकडे सत्तार यांचे लक्ष वेधले असता, ते म्हणाले, मुख्यमंत्री किंवा शिवसेना एमआयएमच्या पोकळ धमक्यांना भीक घालत नाही.

तुम्ही काय केले ते सांगा..

आम्ही सत्तेत  आहोत, सत्ताधारी पक्षाला संयम बाळागावा लागतो. नाहीतर आम्ही त्यांना जशास तसे उत्तर देऊ शकतो. इम्तियाज जलील हे आमचेच पाप आहे, त्यांना निवडून आणण्यात माझा देखील हात होता. पण योग्यवेळी आम्ही त्यांना घरी देखील पाठवू.

पंचवीस वर्षात शिवसेनेने काय विकास केला? हे विचारता तेव्हा तुम्ही आमदार होतात, अडीच वर्षापासून खासदार होतात, तुम्ही मतदारसंघाचा किती विकास केला? हे देखील त्यांनी सांगावे. महापालिकेत तुमचे २५ नगरसेवक होते, त्यांच्या वार्डांची काय दुरावस्था आहे, ते बघा, असा टोला देखील सत्तार यांनी यावेळी लगावला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com