Imtiaz Jalil erupted in a frenzy of social distance at a liquor store | Sarkarnama

दारू दुकानावरील सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा पाहून, इम्तियाज जलील भडकले..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 1 जून 2020

देशी दारु दुकानासमोर लांब रांग लागली असून दारु घेण्यासाठी दुकानाच्या शटरसमोर अनेकजण अगदी एकमेकांच्या अंगावर उड्या माराव्यात अशा पध्दतीने गर्दी करत असल्याचे दिसते. यावर ‘ वा, सरकारच्या सोशल डिस्टन्सिंगचे पालन किती चांगल्या पध्दतीने केले जात आहे‘, असे म्हणत इम्तियाज जलील यांनी संताप व्यक्त केला आहे.

औरंगाबादः लॉकडाऊनच्या काळात दारुविक्रीला परवानगी दिल्याच्या कारणावरून नाराज असलेले एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील पुन्हा एकदा भडकले आहे. सरकार ज्या सोशल डिस्टन्सिंगचे नियम घालून देत दारुविक्रीला परवानगी देत आहे, त्याचा कसा फज्जा उडवला जात आहे, याचा एक व्हिडिओच त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर व्हायलर केला आहे. ‘ आणि हेच का तुमचे सोशल डिस्टन्सिंग' असा टोला देखील त्यांनी सरकारला लगावला आहे.

देशात लॉकडाऊन-५ ची घोषणा झाल्यानंतर राज्यात मात्र अनेक गोष्टींना सुट देण्यात आली आहे. त्यापैकी एक म्हणजे शहरी भागात घरपोच तर ग्रामीण भागात थेट दारूविक्रीला परवानगी. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी लॉकडाऊन-४ मध्ये जेव्हा शहरात दारुविक्रीला परवानगी देण्याचा निर्णय झाला होता, तेव्हा कडाडून विरोध दर्शवला होता. एवढेच नाही तर शहरात दारुविक्री सुरू झाली, तर पोलीसांना या दुकांना संरक्षण द्यावे लागेल, आम्हाला जे करायचं ते आम्ही करू, रस्त्यावर उतरू अशी धमकीच त्यांनी दिली होती.

आता लॉकडाऊन-५ मध्ये राज्य सरकारने शहरी भागात घरपोच दारुविक्रीला परवानगी दिली आहे. तर ग्रामीण भागात म्हणजे जिथे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे, अशा ठिकाणी सुरक्षित अंतराचे नियम घालून देत थेट विक्रीला हिरवा कंदील दाखवला आहे. इम्तियाज जलील यांनी शहरालगत असलेल्या पडेगांव भागातील एका देशी दारूविक्री करणाऱ्या दुकान आणि तिथे जमलेली गर्दी याचा एक व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवर व्हायरल करत राज्य सरकारला सुनावले आहे.

या देशी दारु दुकानासमोर लांब रांग लागली असून दारु घेण्यासाठी दुकानाच्या शटरसमोर अनेकजण अगदी एकमेकांच्या अंगावर उड्या माराव्यात अशा पध्दतीने गर्दी करत असल्याचे दिसते. यावर ‘ वा, सरकारच्या सोशल डिस्टन्सिंगचे पालन किती चांगल्या पध्दतीने केले जात आहे‘, असे म्हणत इम्तियाज जलील यांनी संताप व्यक्त केला आहे. दारुविक्रीला परवानगी मिळाल्यानंतर पहिल्याच दिवशी हे चित्र दिसल्यामुळे त्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या रिक्षा घरासमोर उभ्या ठेवून उपसमारीच्या संकटाला शहरातील हजारो रिक्षाचालक तोंड देत आहेत. पण सरकार मात्र रिक्षामध्ये बसणारे प्रवासी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणार नाही असे सांगत रिक्षा चालवण्यास परवानगी देत नाहीयेत.  दारुच्या दुकांनावर मात्र नियमांची अशी पायमल्ली होतांना सरकारला चालते का? असा सवाल देखील इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख