इम्पेरिकल डाटा कुणाची खाजगी संपत्ती नाही; भुजबळांनी ठणकावले..

ओबीसी आरक्षण पुनर्स्थापित करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षांनी वज्रमूठ आवळल्याचे या मेळाव्यातून दिसून आले.
इम्पेरिकल डाटा कुणाची खाजगी संपत्ती नाही; भुजबळांनी ठणकावले..
Chhagan Bhujbal-Obc Reservation News Latur

लातूर : ओबीसी आरक्षण जनजागृती जागर मेळाव्यात शनिवारी आरक्षण लढ्याला दिशा देण्याचे काम होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला. राज्यपातळीवरील मान्यवरांनीही या मेळाव्यात ऑनलाइन मार्गदर्शन करून आपण आरक्षणाच्या मागणीसाठी कायम सोबत असल्याचे सांगितले. (Imperial data is no one's private property; Bhujbal knocked) ओबीसी आरक्षण पुनर्स्थापित करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षांनी वज्रमूठ आवळल्याचे या मेळाव्यातून दिसून आले. तर इम्पेरिकल डाटा ही कुणाची खाजगी संपत्ती नाही, अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी केंद्राला ठणकावले.

मेळाव्याचे उद्धाटन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी ॲड. अण्णाराव पाटील यांची उपस्थिती होती. ( Obc Reservation Conference, Latur) तर  राज्याचे मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, माजीमंत्री पंकजा मुंडे, भाजप ओबीसी प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी ऑनलाइन सहभागी होऊन मेळाव्याला मार्गदर्शन केले.  

यावेळी आमदार राजेश राठोड, माजी आमदार रामराव वडकुते, ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप, औशाचे नगराध्यक्ष अफसर शेख आदींची उपस्थिती होती. ( Minister Chagan Bhujbal, Mahrashtra) आरक्षण पुनर्स्थापित होणार नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, असा ठराव या मेळाव्यात घेण्यात आला.

ओबीसी आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार...

इम्पेरिकल डाटा न दिल्याने आरक्षण स्थगित झालेले आहे. हा डाटा ही कोणाच्या घरची संपत्ती नाही. केंद्र सरकारने तो दिला नाही तरीही न्यायालयात सादर करण्यासाठी डाटा जमा करण्याचे काम राज्य सरकार करणार आहे. आरक्षण कायम राहावे यासाठी आपण सर्वोच्च न्यायालयात जात आहोत. राज्य सरकारने त्यासाठी आयोगाची स्थापना केलेली असून डाटा जमा करण्याचे काम सुरू असल्याचे छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

तर ओबीसी हा अनेक जातींचा समूह आहे. या सर्व जातींसाठी नवी मशाल पेटवायची आहे. सर्वांनीच आपआपल्या पक्षाचे जोडे बाहेर ठेऊन मूठ बांधायची आहे. आम्ही कोणाच्या विरोधात नाही, कोणाचे आरक्षण हिसकावून घेणार नाही परंतु जे आजपर्यंत आमच्यासाठी होते ते सोडणार नाही, संसदेत काहीही झाले तरी आम्ही लढा सोडणार नाही, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ठणकावून सांगितले.

कवचकुंडले हिरावून घेतली..

आरक्षण ही ओबीसीची कवचकुंडले आहेत. ही कवचकुंडलेही हिरावून घेण्याचे काम झालेले आहे. आरक्षण पूर्ववत व्हावे यासाठी सर्वच समाजबांधवांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेऊन एकत्रित लढा देणे आवश्यक आहे. हा लढा आरक्षण मिळेपर्यंत सुरू ठेवणे गरजेचे आहे. या लढण्यात मी कायम तुमच्यासोबत राहील, असा विश्वास भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी यावेळी दिला.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in