देशाचे स्वातंत्र्य, एकात्मिता, संविधान टिकवायचे असेल तर काॅंग्रेसच्या पाठीशी उभे राहा..

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कॉंग्रेसने देश जोडला, गावागावांत रस्ते, सोयी सुविधा दिल्या. देशातील जनता एकत्र आणली
Congress leader Nana Patole News aurangabad
Congress leader Nana Patole News aurangabad

औरंगाबाद ः देशात दडपशाहीचे राजकारण सुरू असून, इंग्रजांनी देशाची फाळणी केली. आता पुन्हा जाती धर्माच्या नावाखाली देशाची फूट पाडण्याचा डाव आखला जात आहे, असा आरोप कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर केला. (If you want to maintain the independence, unity and constitution of the country, stand behind the Congress.) देशाचे स्वातंत्र्य, एकात्मिता व संविधान टिकवायचे असेल तर काॅंग्रेसच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहनही पटोले यांनी केले.

कॉग्रेस पक्षातर्फे सोमवारी `व्यर्थ न हो बलिदान` या उपक्रमांतर्गत स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करण्यात आला. (Congress State President Nana Patole) भाजपकडून कॉग्रेसचे विचार संपविण्याचा प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान म्हणतात, १४ ऑगस्ट हा देशाच्या फाळणीचा स्मृतीदिन म्हणून साजरा करा. पण देशाच्या फाळणीच्यावेळी झालेला रक्तपात कोणीही विसरलेला नाही. अशा वाईटदिवसाचा स्मृतीदिन मानायचा का? असा सवाल पटोले यांनी केला.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कॉंग्रेसने देश जोडला, गावागावांत रस्ते, सोयी सुविधा दिल्या. देशातील जनता एकत्र आणली, पण आता पुन्हा एकदा जाती -धर्माचे राजकारण सुरू आहे. मी काही दिवस तिकडे होतो, त्यामुळे ते जे बोलतात याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. देशाचे स्वांतत्र्य, एकत्मिता आणि संविधान टिकवून ठेवायचे असेल, तर आपल्या पुन्हा एकदा मोठ्या ताकदीने काॅंग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहावे लागेल, असे आवाहन देखील पटोले यांनी केले.

चुकीचे आरक्षण का दिले?

ओबीसींचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले.  मराठा आरक्षण राज्यांना अधिकार नसतांना तेव्हाच्या मुख्यमंत्री आणि दिल्लीतील भाजप नेत्यांचे विश्वासू फडणवीस यांनी देऊ केले. विधानसभेच्या सभागृहात त्यांनी आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिल्याचे सांगितले.

मग जर एखाद्या समाजाला मागास ठरवण्याचा अधिकारच राज्याला नव्हता, ते अधिकार केंद्राकडे होते, तर मग फडणवीसांनी मराठा समाजाला चुकीच्या पद्धतीने आरक्षण का दिले?असा सवाल देखील पटोले यांनी उपस्थित केला.

घटना दुरुस्ती नंतर आता ते दाढीवाले मोदी सांगातयेत की ओबीसींना आरक्षण आम्ही दिले, पण ओबीसांनी आरक्षण मोदींनी नाही, तर डाॅ. बाबासाहेब आंबडेकरांच्या संविधानाने दिल्याचे पटोले म्हणाले. महिलांना राजकीय आरक्षण दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी दिले, त्यामुळेच राजकारणात आज महिला पुरूषांच्या बरोबरीने काम करत असल्याचेही पटोले यांनी सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com