नियम पाळले तर दहा दिवसांचा लॉकडाऊन अन्यथा कालावधी वाढेल

अंशत: लॉकडाऊनमध्ये नियम पाहले नाहीत. तरीही प्रशासनाने कारवाया केल्या नाहीत. आता नाईलाज असल्याचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप म्हणाले.
Beed Lock Down News- Collector Press
Beed Lock Down News- Collector Press

बीड : कोरोना विषाणू संसर्गाचे वाढते रुग्ण आणि तपासणीतील वाढते शेकडा प्रमाण यामुळे अखेर जिल्ह्यात दहा दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. गुरुवार - शुक्रवारच्या (ता. २६) मध्यरात्रीपासून सुरु होणारे लॉकडाऊन चार एप्रिल पर्यंत असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दिली.

लोकांना अनेक संधी दिल्या, अंशत:लॉकडाऊनमध्ये नियमांचे उल्लंघन करुनही कारवाया केल्या नाही, तपासण्या करुन घेतल्या नाहीत म्हणून शेवटी संसर्गाची साखळी तोडण्यासाठी हा पर्याय निवडल्याचे जिल्हाधिकारी जगताप यांनी सांगीतले.
जगताप यांनी बुधवारी (ता. २४) पत्रकार परिषदेत लॉकडाऊनची घोषणा आणि त्यातील तरतुदींची माहिती दिली.

लोकांनी नियमांचे व्यवस्थीत पालन केले तर दहा दिवसांचाच लॉकडाऊन असेल, अन्यथा कालावधीही वाढू शकतो, असेही जगताप यांनी स्पष्ट केले. या कालावधीत लग्नसमारंभ, सभा, शाळा, हॉटेल, बाजारपेठा, महाविद्यालये, बगिचे, क्रिडांगणे, मॉर्निंग वॉक, केश कर्तनालये, ब्युटी पार्लर, प्रशिक्षण संस्था, खासगी वाहने बंद असतील. तर अत्यावश्यक सेवांची दुकाने, दवाखाने सुरु राहतील.

खासगी अस्थापना पूर्णत: बंद राहणार असून शासकीय कार्यालये ५० टक्के उपस्थितींमध्ये सुरु राहतील. या काळात निवडक पेट्रोल पंप सुरु राहतील. आजारी लोकांच्या तपासण्या, कोविड तपासण्या व लसीकरण सुरु राहील. अत्यावश्यक कारणांसाठी परवानग्या देण्यात येतील.

काय सुरु काय बंद

सार्वजनिक, खाजगी क्रिडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बगीचे बंद राहतील. तसेच सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग, इव्हीनींग वॉकही बंद. हॉटेल, सर्व अनुज्ञप्त्या, लॉज, मॉल, बाजार, बंद राहतील. कोविड संक्रमित रुग्णांसाठी व इतर रुग्णांसाठी जेवण, नाष्टा, चहा व इतर पुरवठा करण्यासाठी पुर्व परवानगी दिलेले सुरु राहतील. केशकर्तनालये, ब्युटी पार्लर बंद राहतील.

शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, सर्व प्रकारचे शिकवणी बंद राहतील. विद्यापीठांच्या परीक्षा सुरु असतील.सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने बंद राहतील. पण, अत्यावश्यक सेवेतील वाहने, पूर्व परवानगी प्राप्त वाहने व वैद्यकिय कारणास्तव प्रवासासाठी खाजगी वाहनाचा वापर करता येईल.

कोरोना उपाययोजनांचे काम करणाऱ्या नगरपालिका, पोलीस, व शासकीय कार्यालयांची वाहने सुरु राहीत. अत्यावश्यक सेवा व वस्तू यांचा पुरवठा करणारी पुर्व परवानगी असलेले वाहने सुरु राहतील. शासकीय वगळता सर्व बांधकामे बंद राहतील. चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणुक उद्योग, नाट्यगृह, प्रेक्षागृह बंद राहतील.
मंगल कार्यालय, हॉल, लग्न समारंभ, स्वागत समारंभ बंद राहतील.

सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व सभा बंद राहतील. धार्मिक स्थळे, सार्वजनिक प्रार्थनास्थळे बंद राहतील.
बीड जिल्ह्यातील सर्व खाजगी कार्यालये संपूर्णत: बंद राहतील. परंतु, ताळमेळ, बॅकेत चलन भरण्याची कामे करण्यास परवानगी असेल. दुकानाचे शटर बंद करून आत क्लोजिंगचे कामे करण्यास जास्तीत जास्त तीन व्यक्तीस परवानगी असेल.

सर्व किराणा दुकानाची ठोक विक्रेते सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत सुरु राहतील. किरकोळ विक्रेत्यांना सात ते नऊ या वेळेत घरपोच किराणा मालाचा पुरवठा करता येईल. दुध विक्री व वितरण सकाळी दहा वाजेपर्यंत करता येईल. दुध संकलन विहीत वेळेनुसार सुरु ठेवता येईल. भाजीपाला व फळांची ठोक विक्री सकाळी सात ते नऊ या वेळेत किरकोळ विक्रेत्यांना विक्री करतील. किरकोळ विक्रेते एका ठिकाणी न थांबता मास्क लावून गल्लोगल्ली फिरुन सकाळी सात ते १२ या वेळेतच विक्री करतील.


सर्व खाजगी व सार्वजनिक वैद्यकिय सेवा, पशुचिकित्सा सेवा त्यांचे नियमित वेळेनुसार सुरु राहतील. सर्व रुग्णालये व रुग्णालयाशी निगडीत सेवा आस्थापना त्यांचे नियमित वेळेनुसार सुरु राहतील व कोणतेही रुग्णालय लॉकडाऊनचा आधार घेऊन रुग्णांना आवश्यक सेवा नाकरणार नाही.ऑनलाईन औषध वितरण सेवा व दवाखान्याशी संलग्न असलेली सर्व दुकाने सुरु राहतील.

Edied By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com