नाना पटोलेंनी सुभाष देसाईंचा औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा आक्रमकपणे खोडला...

किमान समान कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. त्यामुळे संभाजीनगर हा विषय जेव्हा मंत्रिमंडळासमोर येईल, तेव्हा पाहिले जाईल.
नाना पटोलेंनी सुभाष देसाईंचा औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा आक्रमकपणे खोडला...
Congress leader Nana Patole-Subhash Desai News aurangabad

औरंगाबाद : वाढती महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्‍न, बेरोजगारी अशा प्रश्‍नांनी जनता त्रस्त आहे. कॉंग्रेससाठी जनतेचे प्रश्‍न महत्त्वाचे आहेत. पण या प्रश्‍नांना बगल देण्यासाठी भावनिक विषय पुढे आणले जातात. (If people's problems are solved, then Congress is not against Sambhajinagar.) औरंगाबादचे नामकरण करून जनतेचे प्रश्‍न सुटणार असतील तर कॉंग्रेसचा कोणत्याही नावाला विरोध नाही, असे स्पष्ट मत कॉंग्रेसचे

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. `व्यर्थ न हो बलीदान`, या उपक्रमाअंतर्गत कॉंग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात आला. (Congress State President Nana Patole) त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. औरंगाबाद महापालिकेसह राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका कॉंग्रेस स्वबळावर लढणार आहे, हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही, असे त्यांनी नमूद केले.

औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी `संभाजीनगर` नामकरणाची हीच योग्य वेळ आहे, असे वक्तव्य केले आहे. त्यावर पटोले म्हणाले, सध्या जनता महागाई, बेरोजगारीने त्रस्त आहे. शेतकऱ्याचे प्रश्‍न आहेतच, ते कॉंग्रेससाठी महत्त्वाचे आहेत. या प्रश्‍नांना बगल देण्यासाठीच भावनिक प्रश्‍न वारंवार समोर आणले जातात. शहराचे नाव बदलण्याने हे प्रश्‍न सुटणार असतील, तर तरी कॉंग्रेसचा नाव बदलण्यास विरोध नाही.

औरंगाबादच्या विमानतळाला संभाजीराजेंचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यावर निर्णय का होत नाही?  यावर देखील आघाडी सरकार स्थापन होताना किमान समान कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. त्यामुळे संभाजीनगर हा विषय जेव्हा मंत्रिमंडळासमोर येईल, तेव्हा पाहिले जाईल, असे सांगत पटोले यांनी याविषायवर अधिक बोलणे टाळले.

रस्ते कामांची श्वेतपत्रिका काढा..

राज्यातील रस्त्यांच्या कामात शिवसेनेचे लोक अडथळे आणत असल्याचा आरोप करत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे.  या प्रश्‍नावर पटोले यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामात मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप केला. रस्ते कामांची अंदाजपत्रक थेट खासगी एजन्सीकडून तयार केली जात आहेत. रस्त्यांच्या कामांचे ऑडिट करून श्‍वेतपत्रिका काढण्याची आमची मागणी आहे, असेही पटोले म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in