पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर त्यांचा योग्यच सन्मान होईल..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तर आपल्याला भावासारखे आहेत, असा उल्लेख त्यांच्याकडून नेहमी केला जातो.
Shivsena Minister Sambhuraj Desai-pankaja Munde Beed News
Shivsena Minister Sambhuraj Desai-pankaja Munde Beed News

बीड ः पंकजा मुंडे या स्व.गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा चालवतात. त्या बीड जिल्हा आणि महाराष्ट्रातील मोठ्या नेत्या आहेत. त्यामुळे त्या शिवसेनेत  आल्या तर त्यांच्या योग्य सन्मानच केला जाईल, असे म्हणत गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटले आहे. (If Pankaja Munde joins Shiv Sena, he will be given due respect, Said, State Home Minister Sambhuraj Desai) शिवसेनेतील एका मंत्र्यांने भाजपन नेत्या पंकजा मुंडे यांना थेट शिवसेनेत येण्याचे हे आमंत्रणच असल्याची चर्चा या निमित्ताने राजकीय वर्तुळात सुरू आहे.

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व त्यांच्या भगिनी खासदार डाॅ. प्रीतम मुंडे यांना दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांकडून डावलले जात असल्याची भावना मुंडे भगिनी आणि त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. (Bjp Leader Pankaja Munde Beed) आधी पंकजा मुंडे आणि आता प्रितम यांनाही पक्षाने दुर्लक्षि केल्यामुळे त्या प्रचंड नाराज होत्या. यातून त्यांच्या राज्यभरातील समर्थकांनी व भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरू केले होते.

परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील भेटीनंतर हे राजीनामा नाट्य संपुष्टात आले. दरम्यान, पंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करणार अशा जोरदार चर्चा सुरू होत्या. (Shivsena Minister Sabhuraj Desai Maharashtra) परंतु मुंबईत कार्यकर्त्यांसमोर केलेल्या भाषणातून पंकजा यांनी तुर्तास आपण कुठलाच निर्णय घेणार नसल्याचे स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाई यांनी केलेले विधान महत्वाचे समजले जाते.

देसाई हे बीड दौऱ्यावर आहेत, यावेळी पत्रकारांनी त्यांनी पंकजा मुंडे यांच्या नाराजी संदर्भात छेडले, शिवाय त्यांना शिवसेनेत येण्याची आॅफर देणार का? यावर देसाई यांनी सावध प्रतिक्रिया दिली. शंभुराज देसाई म्हणाले, पंकजा मुंडे या राज्यातील मोठ्या नेत्या आहेत. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्षाचा वारसा त्या समर्थपणे पुढे नेत आहेत. केवळ बीड जिल्ह्यातच नाही तर संपुर्ण राज्यात पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे.

त्यामुळे त्यांच्यासारखा नेता शिवसेनेत येणार असेल तर त्याचे आम्ही निश्चितच स्वागत करू. आमच्या पक्षात त्यांच्या योग्य सन्मानच केला जाईल. दरम्यान, भाजपमध्ये मुंडे भगिनींना डावलण्याचे प्रयत्न वांरवार केले जात असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांकडून केला जातो. पंकजा मुंडे यांनी देखील परळीतील पराभवानंतर विधान परिषद, राज्यसभा आणि आता केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराचे उदाहरण देत जाहीर नाराजी व्यक्त केली होती.

या नाराजीतूनच त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील भाजपचा शत्रू नंबर एक असलेल्या शिवसेनेबद्दल कधी आक्रमक भूमिका किंवा टोकाची टीका केली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तर आपल्याला भावासारखे आहेत, असा उल्लेख त्यांच्याकडून नेहमी केला जातो. त्यामुळेच पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या जेव्हा येतात तेव्हा त्या शिवसेनेत जाणार अशी चर्चा सुरू होते. आता पुन्हा गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या या विधानाने या चर्चेला बळ आले आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com