मोदी सरकार घालवायचे असेल तर काॅंग्रेसने त्याग करावा..

देशातील अनेक पक्ष आज काॅंग्रेसच्या नेतृत्वाखाली यायला तयार नाहीत. अशा वेळी शरद पवार हेच एक असे नेते आहेत ज्यांच्या अध्यक्षतेखाली युपीएतील घटक पक्ष पुन्हा एकत्र येऊ शकतील.
Shivsena Leader Sanjay Raut News Aurangabad
Shivsena Leader Sanjay Raut News Aurangabad

औरंगाबाद ः सध्या देशातील एनडीएची शकले उडाली आहेत. या दलातील सर्वात जुने घटक पक्ष असलेला प्रकाशसिंग बादल यांचा अकाली दल, शिवसेना, चंद्राबाबू नायडू हे सगळेच आज बाहेर पडले आहेत. तसेच युपीएचे अस्तित्व देखील राहिलेलं नाही. युपीएच पुनर्गठण करण्याची वेळ आली आहे. केंद्रातील मोदी सरकार घालवायचे असेल तर काॅंग्रेसने मनाचा मोठेपणा दाखवून त्याग करायला हवा, अशी अपेक्षा शिवेसना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.

औरंगाबादेतील एका प्रकट मुलाखती दरम्यान संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकार घालवण्यासाठी त्यांच्या विरोधात देशपातळीवर एक मोठी आघाडी निर्माण होण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. भाजप आपल्या विरोधात नेतृत्वच उभे राहू देत नसले तरी देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली एक मजबुत आघाडी तयार होई शकते असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

देशातील अनेक पक्ष आज काॅंग्रेसच्या नेतृत्वाखाली यायला तयार नाहीत. अशा वेळी शरद पवार हेच एक असे नेते आहेत ज्यांच्या अध्यक्षतेखाली युपीएतील घटक पक्ष पुन्हा एकत्र येऊ शकतील. उद्धव ठाकरे यांनी देखील यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. राष्ट्रीय नेतृत्व म्हणून ते पुढे येत आहेत. आज महाराष्ट्रातील आघाडी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देश त्यांना ओळखतो.

मुख्यमत्री होण्याची देखील त्यांची इच्छा नव्हती, पण महाराष्ट्राची गरज म्हणून त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली. तसेच देशाची गरज म्हणून भाजप विरोधी आघाडीचे नेतृत्व शरद पवारांकडे सोपवण्यासाठी काॅंग्रेसने मनाचा मोठेपणा दाखवून त्याग करावा, असे आवाहन संजय राऊत यांनी केले.

दिल्ली मुकबधीर झाली आहे..

देशाची राजधानी सध्या मुकबधीर झाली आहे, अशी टीका देखील संजय राऊत यांनी केली. विरोधक आणि सत्ताधारी पक्षात आधी जे मित्रत्वाचे संबंध होते, एकमेकांना भेटणे, सोबत जेवणे हे चित्र आता अजिबात राहिलेले नाही. भाजपचे काही आमचे मित्र आपल्याकडे पहायला आणि हात मिळवायला देखील घाबरतात, एवढी दहशत दिल्लीत आहे. दिल्ली हे दिलदार शहर म्हणून ओळखलं जात होतं, पण आता इथे पुन्हा मोगलाई आली की काय? असे वाटू लागले आहे. हे शहर मुर्दांडाचे शहर बनले आहे, असेही राऊत म्हणाले.

संजय राठोडांच्या राजीनाम्याची गरज नव्हती..

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेतले जात होते. चौकशी आधीच त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणाचा तपास अद्याप संपलेला नाही, चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यायची गरज नव्हती, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. संजय राठोड शिवसेनेचा जुना आणि चांगला कार्यकर्ता आहे. भाजपची सत्ता असलेल्या अनेक राज्यात अशा प्रकारच्या घटना घडल्या, नेत्यांवर आरोप झाले, यातील किती जणांनी राजीनामे दिले, असा सवाल देखील राऊत यांनी केला.

केंद्रशाशित प्रदेशातील सातवेळा विजयी झालेला खासदार मुंबईत येऊन आत्महत्या करतो ही आश्चर्यांची गोष्ट आहे. या खासदाराने लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये अनेक भाजप नेत्यांची नावे आहेत. देशाच्या इतर राज्यात आत्महत्या केली तर आपल्याला किंवा मृत्यूनंतर कुटुंबाला न्याय मिळणार नाही. महाराष्ट्रातच तो मिळू शकतो असा विश्वास त्यांना होता. महाविकास आघाडी सरकार व मुंबई पोलिसांवर विश्वास असल्यामुळेच त्या खासदारांनी मुंबईत आत्महत्या केली असावी, असेही राऊत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com