गोपीनाथ मुंडे राजकारणात नसते, तर आम्ही हरिपाठ करत बसलो असतो..

बाळासाहेब ठाकरे हे मोठे नेते होते, महाराष्ट्रात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
Railway state Minister Raosaheb Danve- press News jalana
Railway state Minister Raosaheb Danve- press News jalana

जालना ः गोपीनाथ मुंडे हे राजकारणात नसते तर मी, संतोष दानवे, नारायण कुचे आम्ही कुठल्यातरी गावात मंदीराच्या पारावर हरिपाठ करत बसलो असतो, असे म्हणत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी घोषणाबाजीच्या विषयाला बगल दिली.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जनआशिर्वाद यात्रे दरम्यान, नाराज मुंडे समर्थकांनी काल रात्री घोषणा केली. कराड यांच्या नियुक्तीमुळे मुंडे समर्थक नाराज आहेत का? (If Gopinath Munde was not in politics, we would have been doing Haripath. Said Minister Raosaheb Danve) असा प्रश्न विचारला असता रावसाहेब दानवे यांनी कुणीही नाराज नाही, आमच्या सारख्या राजकीय लोकांच्या सभेत कुणीही येऊन घोषणाबाजी करू शकतो, असे स्पष्ट केले.

केंद्रात मंत्रीपद मिळाल्यानंतर डाॅ. भागवत कराड यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील पाच लोकसभा मतदारसंघातून जनआशिर्वाद यात्रा काढण्यात आली. (Central State Finance Minister Dr.Bhagwat Karad) परळी व नंतर गोपीनाथ गडावर स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन यात्रेला सुरूवात करण्यात आली होती. (Jan Ashirwad Rally, Jalna) परळी आणि गोपीनाथ गडावर पकंजा मुंडे समर्थकांकडून घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यांनतर परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात यात्रेला उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला.

परंतु काल जालन्यात दानवे-कराड यांच्या उपस्थितीत निघालेल्या संयुक्त यात्रे दरम्यान, रात्री काही मुंडे समर्थकांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे फोटो हातात घेऊन घोषणाबाजी केली. आज पत्रकार परिषदे दरम्यान, रावासाहेब दानवे यांनी या संदर्भात विचारले असता, त्यांनी मुंडे समर्थकांमध्ये कुठल्याही प्रकारची नाराजी नसल्याचे स्पष्ट केले. आमच्या राजकीय सभांमध्ये कुणीही येऊन घोषणाबाजी करू शकतो.

गोपीनाथ मुंडे जर राजकारणात नसते तर माझ्यासह संतोष दानवे, नारायण कूचे आणि अनेक भाजपमधील आमदार, खासदार गावातील मंदिराच्या पारावर हरिपाठ करत बसले असते. त्यामुळे नाराजी वगैरे काही नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवाजी पार्क येथे जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. शिवसेनेने त्यांना विरोध केला होता.

शिवसेनेचे गलिच्छ राजकारण..

यावर बाळासाहेब ठाकरे हे मोठे नेते होते, महाराष्ट्रात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. अशा नेत्याचे स्मृतीस्थळ जेव्हा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी उभारले जाते, तेव्हा तिथे जाण्यापासून कुणालाही रोखता येत नाही. दिल्लीत इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी यांची स्मृतीस्थळे आहे. तिथे देखील सगळ्या पक्षाचे, जाती धर्माचे लोक येऊन दर्शन घेतात. मी स्वतः इंदिरा गांधी यांच्या स्मृतीस्थळाचे अनेकदा दर्शन घेतले आहे. त्यामुळे राणे यांना रोखण्याचे गलिच्छ राजकारण शिवसेनाच करू शकते, अशी टीका देखील दानवे यांनी केली.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com