मी बिनविरोध निवडून आले असते, पण वडिलांना मला सहजासहजी काही मिळू द्यायचे नाहीये..

मी राजकारणात आले तेव्हा अनेकांनी माझ्या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केले. कशाला ताई राजकारणात येता, ते देखील परभणी जिल्ह्याच्या असे मला अनेकांनी सांगितले.
Parbhani District Bank- Bordikar- News
Parbhani District Bank- Bordikar- News

परभणी ः जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीत मी बिनविरोध निवडून आले असते, पण माझे वडिल रामप्रसाद बोर्डीकर यांना मला सहजासहजी काय मिळू द्यायचे नाहीये. मी राजकारणातील प्रत्येक परीक्षेला खरी उतरावे, असा त्यांचा प्रयत्न असतो, त्यामुळे ही निवडणूक होत असल्याचे भाजप आमदार व परभणी जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवार मेघना बोर्डीकर साकोरे म्हणाल्या.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे. माजी आमदार व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष राहिलेल्या रामप्रसाद बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनल या निवडणुकीत मैदानात उतरले आहे. स्वतः बोर्डीकर हे बिनविरोध निवडले गेले आहेत. काल भाजपच्या प्रचार सभेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार ्बाबाजाणी दुर्राणी यांनी हजेरी लावली आणि जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीला वेगळीच कलाटणी मिळाली.

आमदार मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीतील प्रचार सभेत दुर्राणी यांची हजेरी सगळ्यांनाच बुचकाळ्यात टाकणारी होती. यावेळी बोलतांना मेघना बोर्डीकर यांनी दुर्राणी यांच्या निर्णयाचे स्वागत करतांना खाॅं साहेेब जेव्हा एखादा शब्द दिला तर तो मागचा-पुढचा विचार न करता पुर्ण करतातच. त्यांच्या निर्णयाने विरोधकांच्या पोटात भितीचा गोळा उठला आहे. बोर्डीकर साहेब, खाॅ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे काम करू, असा विश्वास व्यक्त केला.

मी राजकारणात आले तेव्हा अनेकांनी माझ्या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केले. कशाला ताई राजकारणात येता, ते देखील परभणी जिल्ह्याच्या असे मला अनेकांनी सांगितले. पण शेवटी राजकारणात आले आणि लोकांनी मला भरभरून प्रेम दिले. पण राजकारणात सगंळ सहज मिळत नाही, इतरांप्रमाणे मला देखील कष्ट करावे लागले, लोकांमध्ये जाऊन काम करावे लागले.

आता देखील जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळातील उमेदवार म्हणून मी माझ्या मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले असते. पण माझ्या वडिलांनी मला ही परिक्षा द्यायला भाग पाडले. कुठलीही गोष्ट सहज मिळाली की त्याचे मोल राहत नाही, त्यासाठी कष्ट घेतले तर त्याचे महत्व कळते. माझ्या वडिलांना देखील मी सगळ्या परिक्षांमध्ये खरी उतरावी असे वाटत असल्यानेच त्यांनी मला बिनविरोध न करता निवडणूकीला सामोरे जाण्यास सांगितल्याचे मेघना बोर्डीकर आपल्या भाषणात म्हणाल्या.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com