मी पुरग्रस्त भागात जाणार नाही, पण आपली मदत तिथे पोहचली पाहिजे..  - I will not go to the flood affected area, but your help should reach there.jp75 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

मी पुरग्रस्त भागात जाणार नाही, पण आपली मदत तिथे पोहचली पाहिजे.. 

प्रा. प्रवीण फुटके
गुरुवार, 29 जुलै 2021

मी परळीची आहे, परळीची कार्यकर्ती आहे, त्यामुळे इथेच मी रॅली काढून पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करत आहे.

परळी (जि. बीड) :पूरग्रस्त भागात जाण्याऐवजी त्याठिकाणी मदत पोहोचवणार असल्याचे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे गुरुवारी सांगितले. (I will not go to the flood affected area, but your help should reach there, Said Pankaja Munde) भाजपच्या वतीने पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात शहरात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निघालेल्या फेरीत दानशुरांनी भरभरुन मदत दिली.

पंकजा मुंडे म्हणाल्या, आम्ही प्रत्येक संकटात गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे मदत करतो. वाढदिवस हा नेत्याचा सोहळा असतो. (Bjp Leader Pankaja Munde Parali, Beed) पण व्यक्तीचा सोहळा दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडेंना मान्य नव्हता. त्यामुळे माझ्या वाढदिवसाचा सोहळा नको अशी कार्यकर्त्यांना विनंती केली होती.

कार्यकर्त्यांनी पुरग्रस्तांना केलेल्या मदतीचेही त्यांनी कौतूक केले मी परळीची आहे, परळीची कार्यकर्ती आहे, त्यामुळे इथेच मी रॅली काढून पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करत आहे.  पूरग्रस्त भागात जाण्याऐवजी मदत तिथे गेली तर ते फायद्याचे आहे. आपण तिथे जाण्यापेक्षा, तिथे मदत पोहोचावी, परिस्थिती खूप कठीण आहे, बिकट आहे.

काही गावं मुख्य प्रवाहातून तुटली आहेत. त्यांना उभं करावं लागेल. अशा परिस्थितीत त्यांना मदत मिळणे आवश्यक आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्. मी सध्या तरी त्याठिकाणी जाणार नाही. मी जाण्याने गर्दी होऊन यंत्रणांवर ताण नको. त्यापेक्षी मी माझी मदत तिकडे पाठवेन, जिथे पूरग्रस्तांना मदत हवी आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मदतफेरीला सुरवात झाली. बस स्थानक रोड, एकमिनार चौक, स्टेशन रोड, टाॅवर, गणेशपार आदी प्रमुख मार्गावरून ही मदतफेरी काढण्यात आली. भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच वैद्यनाथ काॅलेजचे विद्यार्थी यात सहभागी झाले होते.

फेरी निघाल्यानंतर काही वेळातच मोठी रक्कम जमा झाली तसेच व्यापाऱ्यांनी किराणा साहित्य व इतर जीवनावश्यक वस्तू पूरग्रस्तांना दिल्या. ही सर्व मदत एकत्रित ट्रकद्वारे पूरग्रस्तां पाठविण्यात येणार आहे.

हे ही वाचा ः किरीट सोमय्या अडचणीत, सरनाईकांनी केला शंभर कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख