खऱ्या शेतकऱ्यांना डावलून शहरी उमेदवार लादले म्हणून मी बोर्डीकरांसोबत गेलो..

धनगर, हटकर व माळी समाज खऱ्या अर्थाने शेतकरी म्हणून ओळखला जातो.जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची असल्याने या समाजाला या निवडणुकीत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली पाहिजे.
Parbhnai District Bank- Bordikar- Durani News
Parbhnai District Bank- Bordikar- Durani News

पाथरी : शेतकऱ्यांची व शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत  वरपूडकरांनी खऱ्या शेतकऱ्यांना उमेदवारी डावलल्यामुळेच आपण बोर्डीकर गटा सोबत असल्याचे आमदार बाबाजानी दुराणी यांनी स्पष्ट केले. बँक वाचवायची असेलतर मतदारांनी तुळजा भवानी शेतकरी विकास पँनलला मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजाणी दुराणी यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत ऐनवेळी बोर्डीकर गटाला समर्थन दिल्यामुळे जिल्हाभरात चर्चेला उधाण आले होते. या निर्णया मागे आपली काय भूमिका होती, हे आज दुर्राणी यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले.

दुराणी म्हणाले, धनगर, हटकर व माळी समाज खऱ्या अर्थाने शेतकरी म्हणून ओळखला जातो. जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची असल्याने या समाजाला या निवडणुकीत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली पाहिजे. आपण स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष दत्ता मायंदळे यांना उमेदवारी देण्याचा आग्रह सुरेश वरपूडकरांकडे धरला होता. परंतु त्यांनी मर्जीतील शहरी भागातील व्यक्तीला उमेदवारी दिली.

शेतकऱ्यांची बँक असतांना वरपूडकरांनी खऱ्या शेतकऱ्यांना डावलल्यामुळे आपण नाराज असतांना रामप्रसाद बोर्डीकर यांनी त्यांच्या तुळजा भवानी शेतकरी विकास पॅनल मध्ये काँग्रेसच्या व माळी समाजाच्या प्रल्हाद चिंचाने यांना उमेदवारी दिली. हटकर समाजाला ही प्रतिनिधित्व द्यावयाचे असून मायंदळे यांना देखील उमेदवारी देण्यासाठी अनुकूलता दर्शवली .

या निवडणुकीत पक्ष व पक्ष्यांचे चिन्ह नसल्याने आपणही एखाद्या समाजाला प्रतिनिधित्व मिळत असल्याने बोर्डीकर यांच्या पॅनल सोबत जाण्याचा निर्णय घेतला. आज जिल्हा बँकेत बाराशे कोटी रुपयांच्या ठेवी असून भविष्यात आपण महाविकास आघाडी सरकारच्या ध्येय धोरणा नुसार शेतकऱ्यांना सक्षम बनविण्यासाठी काम करणार  असल्याचेही दुर्राणी यांनी सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com