बागडे-काळेंच्या राजकारणात उपसभापती शेळके अडकले.. - I was given chairs to sit on, they beat me.jp75 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

बागडे-काळेंच्या राजकारणात उपसभापती शेळके अडकले..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 2 ऑगस्ट 2021

शेळके यांनी पराभूत उमेदवार अनुराग शिंदे, विजय जाधव अन्य आठ ते दहा जणांची नावे घेऊन पोलिसांत तक्रार दिल्याचे समजते.

औरंगाबाद ः मला झालेली मारहाण ही पराभूत उमेदवार अनुराग शिंदे, विजय जाधव आणि त्यांच्या सोबत आलेल्या आठ ते दहा जणांनी केली. माझ्या दालनात बसलेलो असतांना हे सर्वजण आले, मी त्यांना बसायला खुर्च्या दिल्या. पण त्यांनी थेट माझ्यावरच हल्ला चढवला. (I was given chairs to sit on, they beat me. Said, Arjun Shelke panchayt Samitee, Aurangabad) मी शिंदेच्या विरोधात उपसभापती पदाची निवडणूक का लढलो? असे म्हणत या सर्वांनी मला मारहाण केल्याचे पंचायत समितीचे उपसभापती अर्जून शेळके यांनी प्रसार माध्यमांना सांगतिले. एकंदरित भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे आणि काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. कल्याण काळे यांच्या कुरघोडीच्या राजकारणात शेळके भरडले जात असल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.

नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले आणि उपसभापती झालेले अर्जून शेळके यांच्यावर त्यांच्या दालनात काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. (Bjp Mla Haribhau Bagde, Aurangabad) या मारहाणीत शेळके किरकोळ जखमी झाले. भाजपने या मारहाणीचा निषेध करत हा हल्ला सूड भावनेतून केल्याचा आरोप केला आहे. ( Congress District president Dr. Kalyan Kale, Aurangabad) या मारहाणी मागे काॅंग्रेसच्या कुण्या मोठ्या नेत्याचा हात आहे का? या प्रश्नावर मात्र शेळके यांनी मला माहित नाही, असे सांगत अधिक बोलणे टाळले.

पंचायत समितीवर महाविकास आघाडीची सत्ता आहे. सभापतीपद काॅंग्रेसच्या छाया घागरे यांच्याकडे तर उपसभापती पद  शिवसेनेच्या मालती पडूळ यांच्याकडे होते. उपसभापती पदाची मुदत संपल्यामुळे २९ जुलै रोजी निवडणूक घेण्यात आली. काॅंग्रेसकडून अर्जून शेळके व अनुराग शिंदे हे शर्यतीत होते. शेळके हे काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. कल्याण काळे यांचे नातेवाईक असल्याने उपसभापती पदाची उमेदवारी आपल्यालाच मिळेल असा त्यांना विश्वास होता.

मात्र अनुराग शिंदे यांनीही दावा केला आणि उमेदवारी आपल्याला डावलून शिंदेना मिळणार हे शेळके यांच्या लक्षात आले. त्यांनी भाजपशी बोलणी करून उपसभापती पद दिल्यास पक्षात प्रवेश करण्याची तयारी दर्शवली. पंचायत समितीमध्ये विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेल्या भाजपने ही संधी हेरली आणि शेळके यांना उपसभापती पद देण्याचे मान्य केले. त्यामुळे भाजपचे सात, शेळके समर्थक तीन व एक अपक्ष अशा अकरा सदस्यांची मते मिळवत त्यांनी बाजी मारली.

सभापतींचेही मत शेळके यांनाच..

विशेष म्हणजे काॅंग्रेसच्या सभापती छाया घागरे यांनी देखील आपले मत शेळके यांच्याच पारड्यात टाकले. त्यामुळे अर्जून शेळके यांनी भाजपच्या मदतीने उपसभापती पद पटकावले. काॅंग्रेसच्या अनुराग शिंदे यांचा या निवडणुकीत पराभव झाल्याने त्यांच्या मनात खदखद होती. आज अर्जून शेळके सकाळी जेव्हा आपल्या दालनात आले, तेव्हा तिथे आधीच आलेल्या अनुराग शिंदे, विजय जाधव व अन्य काही कार्यकर्त्यांनी तिथे प्रवेश केला.

आपल्यावर हल्ला होणार अशी किंचितही कल्पना शेळके यांना नव्हती. त्यामुळे त्यांनी शिंदे व त्यांच्या सोबत आलेल्या सर्वांना बसण्यासाठी खुर्च्या दिल्या. पण अचानक या सर्वांनी शेळके यांना मारहाण करण्यास सुरूवात केली.  त्यामुळे दालनात एकच गोंधळ उडाला, उपस्थितांनी दालनाकडे धाव घेतली तेव्हा मारहाण करणारे तिथून निघून गेले होते.  शेळके यांनी पराभूत उमेदवार अनुराग शिंदे, विजय जाधव अन्य आठ ते दहा जणांची नावे घेऊन पोलिसांत तक्रार दिल्याचे समजते. फोडाफोडी आणि राजकीय कुरघोडीतून हा प्रकार घडला. 

कुरघोडीच्या राजकारणातून घडला प्रकार..

भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे व काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. कल्याण काळे यांच्या कुरघोडीच्या राजकारणातून हा प्रकार घडल्याचे बोलले जाते. फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत यापुर्वी असचा अनुभव आला होता. त्यानंतर औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवडणूकीतही बागडे- काळे आमने-सामने होते.

पंचायत समिती उपसभापती पदाच्या निवडणुकीत ऐन निवडणुकीच्यावेळी काॅंग्रेसला धोबीपछाड देण्यासाठी भाजपने अर्जून शेळके यांचा वापर केला. शेळके यांना उपसभापती पद तर मिळाले, पण काॅंग्रेसचा रोषही पत्करावा लागला. आमदार हरिभाऊ बागडे यांनी या मारहाणीचा निषेध करतांना सूड भावनेतून हा हल्ला करण्यात आल्याचे म्हटले आहे.

हे ही वाचा ः एमपीएससीः अजितदादांनी शब्द पाळला..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख