ईडीच्या अशा कारवाया कधीच पाहिल्या नव्हत्या.. - I have never seen such actions of ED. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

ईडीच्या अशा कारवाया कधीच पाहिल्या नव्हत्या..

सुषेन जाधव
सोमवार, 12 जुलै 2021

केंद्रीय यंत्रणांचा असा वापर होऊ नये असे म्हणत ईडीच्या राज्यातील कारवायाबद्दल नाराजी व्यक्त केली.

औरंगाबाद ः आजवरच्या ईडीच्या ज्या कारवाया पाहिल्या त्या अशा कधीच नव्हत्या, अशा शब्दांत सध्या राज्यभर ईडीकडून करण्यात येणाऱ्या कारवायांवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. (I have never seen such actions of ED.) सोमवारी (ता.१२) पोलिस दलाच्या आढावा बैठकीनंतर पोलिस आयुक्त कार्यालयात माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

पत्रपरिषदेदरम्यान गृहमंत्र्यांना राज्यातील ईडीच्या कारवाया पाहता जाणिवपूर्वक अडचणीत आणले जातेय का? असे विचारले असता, केंद्रीय यंत्रणांचा असा वापर होऊ नये असे म्हणत ईडीच्या राज्यातील कारवायाबद्दल नाराजी व्यक्त केली. (State Home Minister Dilip Walse Patil)

संचारबंदी असतानाही खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रमुख उपस्थितीत दौलताबादेतील एका फार्म हाऊसमध्ये ३ जुलै रोजी कव्वालीचा कार्यक्रम रंगला होता. दरम्यान उपस्थितांनी खासदारांवर पैसे उधळले होते,  तेव्हा एकच गर्दी झाली होती. (AIMIM Mp Imtiaz Jalil Aurangabad) या प्रकरणी आयोजकांसह ५० ते ६० जणांविरोधात दौलताबाद ठाण्यात गुन्हेही नोंदविण्यात आले, मात्र लोकप्रतिनिधींवर कारवाई का होत नाही?

यावर, गृहमंत्र्यांनी हा चेंडू पोलिस आयुक्तांच्या कोर्टात टोलावला. दरम्यान, आयुक्त डॉ. गुप्ता यांनी या प्रकरणी सहभागींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून खासदार यांनाही आरोपी करण्यात येणार असल्याचे सांगितले.

डीएमआयसीत लवकरच पोलीस ठाणे..

डीएमआयसी भागातील प्रस्तावित दोन पोलिस ठाणे अद्यापही झाली नाहीत, यावर डॉ. निखील गुप्ता यांनी सदर प्रस्ताव तत्कालीन आयुक्तांनी तत्कालीन गृहमंत्र्यांच्या कार्यकाळात पाठविला होता. तो सध्या पोलिस महासंचालक कार्यालयात असल्याचे सांगितले. यावर गृहमंत्र्यांनी आपल्याकडे सदर प्रस्ताव आल्यानंतर लवकरच मार्गी लावू, अशी ग्वाही दिली.  

हे ही वाचा ः मराठा आरक्षण आंदोलनातील उर्वरित गुन्हेही लवकरच मागे घेणार..

Edited By : Jagdish Pansare 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख