गृह,वाहनाप्रमाणेच शैक्षणिक कर्जही पाच टक्के दराने द्या, अर्थराज्यमंत्र्यांकडे मागणी..

शैक्षणिक कर्जावरील व्याजदर कमी करावा व याचा लाभ याआधी शैक्षणिक कर्ज घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना देण्यात यावा.
गृह,वाहनाप्रमाणेच शैक्षणिक कर्जही पाच टक्के दराने द्या, अर्थराज्यमंत्र्यांकडे मागणी..
Mla satish Chavan letter to State Finance minister Krad News Aurangabad

औरंगाबाद : उच्च शिक्षण घेण्यासाठी विविध बँकांमध्ये शैक्षणिक कर्जाचे व्याजदर हे ९ ते १३ टक्के याप्रमाणे आहेत. जे की सर्व सामान्य विद्यार्थ्यांना परवडणारे नाहीत. (Home, vehicle as well as educational loans at five percent interest rate, demand from the Minister of State for Finance) त्यामुळे शैक्षणिक कर्जावरील व्याजदर कमी करावेत, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्याकडे केली आहे.  

यासंदर्भात चव्हाण यांनी आज अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची दिल्ली येथे भेट घेतली. केंद्र सरकारच्या नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय अर्थ राज्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांनी कराड यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. (Mla Satish Chavan Aurangabad) शैक्षणिक कर्जावरील व्याजदर कमी करण्यासंदर्भात कराड यांच्याशी सविस्तर चर्चा करून लेखी निवेदनही दिले.

गेल्या काही वर्षात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे शिक्षणाची अनेक दालने खुली झाली आहेत. पर्यायाने शिक्षणासाठी लागणारा खर्च देखील सर्व सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. (Dr. Bhagwat Karad, State Finance Minister Delhi) उच्च शिक्षण घेण्यासाठी विविध बँकामध्ये शैक्षणिक कर्ज मिळते. मात्र वेगवेगळ्या बँकांमध्ये शैक्षणिक कर्जाचे व्याजदर हे ९ ते १३ टक्के याप्रमाणे आहेत. जे की सर्व सामान्य विद्यार्थ्यांना परवडणारे नाहीत.

ग्रामीण भागातील शेतकरी कटुंबातील अनेक होतकरू, हुशार विद्यार्थ्यांनी कर्ज काढून उच्च शिक्षण पूर्ण तर केले.  मात्र अपुर्‍या संधीमुळे त्यांना अद्यापही नोकरी मिळालेली नाही. त्यात कोविडमुळे सर्वच पालकांचे आर्थिक गणित कोलमडून पडले आहे. त्यामुळे शैक्षणिक कर्जावरील व्याज फेडायचे कसे? असा प्रश्न अनेक विद्यार्थी व पालकांसमोर उभा राहीला आहे.  गृह कर्ज, वाहन कर्ज हे ५ टक्के व्याजदराप्रमाणे मिळते. त्याच प्रमाणे शैक्षणिक कर्ज देखील याच व्याजदराप्रमाणे मिळायला हवे.

पाच लाखापर्यंंतचे कर्ज विनातारण द्या..

आजचे विद्यार्थी हे आपल्या देशाचे भवितव्य आहे. मात्र अनेक ठिकाणी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले तरी केवळ शैक्षणिक शुल्क जास्त असल्याने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे शैक्षणिक कर्जावरील व्याजदर कमी केल्यास गरजू, होतकरू, गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे सोयीचे होईल असेही सतीश चव्हाण यांनी म्हटले आहे.

गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी बॅकांना इष्टांक देण्यात यावे, पाच लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज घेणार्‍या विद्यार्थ्यांना विनातारण कर्ज उपलब्ध करून द्यावे. तसेच शैक्षणिक कर्जावरील व्याजदर कमी करावा व याचा लाभ याआधी शैक्षणिक कर्ज घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना देण्यात यावा, अशी मागणीही कराड यांच्याकडे करण्यात आली.  यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यासाठी लवकरच बैठक आयोजित केली जाईल असे, आश्वासन भागवत कराड यांनी चव्हाण यांना दिले. 

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in