कोरोनातून बरे होणाऱ्यांचे सर्वाधिक प्रमाण कोल्हापूरात, मराठवाड्यात परभणी अव्वल

आरोग्य विभागाने याचे प्रमाण व वर्गवारी नुकतीच जाहीर केली आहे. त्यानूसार राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्य रिकव्हरी रेटमध्ये कोल्हापूर जिल्हा सर्वात आघाडीवर म्हणजे पहिल्या क्रमाकांवर असल्याचे समोर आले आहे. या जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९०.४ इतका नोंदवण्यात आला आहे. तर दुसऱ्या स्थानावर परभणी जिल्हा असून इथला रिकव्हरी रेट ८७.१ इतका आहे.
corona free district percentage news
corona free district percentage news

परभणी : देशावर आणि राज्यावर कोरोनाचे संकट ओढावल्यानंतर त्याचा प्रादुर्भाव हळूहळू मराठवाड्यात देखील झाला. सुरूवातीला कोरोनामुक्त असलेले जिल्हे नंतर कोरोनाच्या विळख्यात सापडले आणि तिथेही बाधितांची संख्या वाढली. मराठवाड्यात सर्वाधिक बाधित आणि मृतांचे प्रमाण हे औरंगाबाद जिल्ह्यात पहायला मिळाले आहे. कोरोना संसर्गाची लागण झाल्यानंतर त्यातून बरे होऊन घरी परतणाऱ्यांचे प्रमाण देखील लक्षणीय आहे. एका पाहणीनूसार कोरोनातून बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांचे सर्वाधिक प्रमाण हे मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात पहायला मिळाले आहे.

परभणी यात अव्वल स्थानी असून त्या खालोखाल हिंगोली, उस्मानाबाद, बीड, लातूर, जालना, नांदेड आणि सर्वात शेवटी म्हणजे आठव्या स्थानी औरंगाबाद जिल्ह्याचा क्रमांक लागतो.

राज्यात कोरोनाचा कहर सुरु आहे, विशेषतः शहरी भागातील नागरिकांना या संसर्गाची लागण मोठ्या प्रमाणात होत आहे. सहाजिकच अशा ठिकाणी मृतांचे प्रमाण देखील वाढत आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद सारख्या मोठ्या शहरात तर कोरोना बाधित आणि मृतांचा आकडा धक्कादायक आहे. एकीकडे हे चित्र असले तरी या महामारीवर मात करून ठणठणीत बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या देखील लक्षणीय असल्याचे समोर आले आहे.

आरोग्य विभागाने याचे प्रमाण व वर्गवारी नुकतीच जाहीर केली आहे. त्यानूसार राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्य रिकव्हरी रेटमध्ये कोल्हापूर जिल्हा सर्वात आघाडीवर म्हणजे पहिल्या क्रमाकांवर असल्याचे समोर आले आहे. या जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९०.४ इतका नोंदवण्यात आला आहे. तर दुसऱ्या स्थानावर परभणी जिल्हा असून  इथला रिकव्हरी रेट ८७.१ इतका आहे. सध्या परभणी जिल्ह्यात ९८ कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी ८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सहा रुग्णावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तिसऱ्या स्थानावर हिंगोली (८४.९), चौथ्या स्थानावर वर्धा (७८.६), पाचव्या स्थानावर गडचिरोली (७८.०), सहाव्या स्थानावर सिंधुदूर्ग (७७.३), सातव्या स्थानावर चंद्रपुर (७५.९), आठव्या स्थानावर अहमदनगर (७४.६), नवव्या स्थानावर उस्मानाबाद (७३.९), तर दहाव्या स्थानावर बीड (६९.९) आहे.

महाराष्ट्रातील इतर जिल्हे व त्यांचा क्रमांक (कंसात रिकव्हीरी रेट)

सातारा-११ (६९.५)
यवतमाळ-१२ (६९.१)
गोंदिया-१३ (६८.३)
रत्नागिरी १४ (६६.७)
धुळे १५ (६५.८)
भंडारा १६ (६५.३)
बुलढाणा १७ (६५.०)
लातूर १८ (६४.१)
अकोला १९ (६३.७)
जालना २० (६३.३)
अमरावती २१ (६३.०)
नागपूर २२ (६२.९)
नांदेड २३ (६२.१)
रायगड २४ (६०.९)
औरंगाबाद २५ (५५.३)
नाशिक २६ (५५.२)
सांगली २७ (५४.६)
पुणे २८ (५४.३)
जळगांव २९ (५२.६)
मुंबई ३० (५०.४)
सोलापूर ३१ (४६.७)
नंदुरबार ३२ (४३.४)
ठाणे ३३ (३९.३)
पालघर ३४ (३०.३)
वाशिम ३५ (२३.९)

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com