आरोग्य मंत्रालय मोदींचेही ऐकत नाही, व्हेंटिलेटरचे ‘ऑडिट’लोकांचे जीव गेल्यावर करणार का?

पंतप्रधानाच्या आदेशाला जर ‘केराची टोपली’ दाखवली जात असेल तर सर्वसामान्य लोकांनी पंतप्रधान म्हणून आपल्याकडून कुठल्या न्यायाची अपेक्षा ठेवायची.
Ncp Mla Satish Chavan News Aurangabad
Ncp Mla Satish Chavan News Aurangabad

औरंगाबाद ः अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास पीएम केअर फंडातून देण्यात आलेले २५ व्हेंटिलेटर तांत्रिक दुरूस्तीअभावी  पडून आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ मे रोजी पीएम केअर फंडातून राज्यांना देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरचे ऑडिट करण्याचे निर्देश दिले होते.  मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याची अद्यापही दखल घेतलेली दिसत नाही. (The health ministry does not even listen to Modi, will it conduct an 'audit' of the ventilator, said Mla Satish chavan)  केंद्र सरकार व्हेंटिलेटरचे ऑडिट  निष्पाप नागरिकांचे जीव गेल्यावर करणार का? असा खोचक सवाल मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांनी केला आहे. 

केंद्र सरकारने पीएम केअर फंडातून विविध राज्यांना दिलेल्या व्हेंटिलेटरसंदर्भात अनेक ठिकाणाहून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर याची दखल स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घ्यावी लागली. (He also directed the Union Ministry of Health to conduct an audit of the ventilator)  सदरील व्हेंटिलेटरचे ‘ऑडिट करण्याचे निर्देश देखील त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिले.  मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याची दखल घेतलेली दिसत नाही.

पंतप्रधानाच्या आदेशाला जर ‘केराची टोपली’ दाखवली जात असेल तर सर्वसामान्य लोकांनी पंतप्रधान म्हणून आपल्याकडून कुठल्या न्यायाची अपेक्षा ठेवायची असा प्रश्न देखील चव्हाण यांनी उपस्थित केला.

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास मिळालेल्या व्हेंटिलेटरची माहिती चव्हाण यांनी घेतली.  रूग्णालयास पीएम केअर फंडातून २५ व्हेंटिलेटर प्राप्त झाले होते. मात्र सदरील व्हेंटिलेटरमधून रूग्णासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने ते बंद अवस्थेत पडून असल्याचे स्पष्ट झाले. 

सदरील रूग्णालयाच्यावतीने कंपनीला या व्हेंटिलेटरची तांत्रिक दुरूस्ती करून देण्याविषयी पत्रव्यवहार करण्यात आला. (If service cannot be provided, the company should stop supplying ventilators) मात्र कंपनीकडून  काहीच उत्तर मिळाले नाही. वेळेवर ‘सर्व्हीस’ देता येत नसेल तर कंपनीने व्हेंटिलेटरचा पुरवठा करणे बंद करावे, अशी मागणी  देखील चव्हाण यांनी केली आहे. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com